प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात
जुन्या जळगावात नागरिकांकडून पुष्पवृष्टी, महिला भगिनींकडून औक्षण : जेष्ठाकडून घेतले शुभाशीर्वाद
रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी घेतली आघाडी
जळगाव : जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ आज मंगळवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी जुन्या जळगावात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आला. प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. भोळे यांनी प्रचाराची सुरुवात केली. यानंतर जुने जळगाव परिसरातील विविध भागांमध्ये जाऊन आ. राजूमामा भोळे यांची प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये जनतेमधून भरभरून प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी औक्षण करून तसेच पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
जुने जळगाव परिसरातील विविध कॉलनीमध्ये महिला भगिनींनी आ.राजूमामा भोळे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक भागात आ. भोळे यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून येत होता. प्रचार रॅलीत ‘कहो दिल से, राजूमामा फिर से’, एक, दोन, तीन, चार… राजूमामाच होणार आमदार’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या.
रॅलीत खा. स्मिता वाघ, माजी महापौर सीमाताई भोळे यांचेदेखील महिला भगिनींनी औक्षण केले. गोपाळपुरा परिसरातील भोलेनाथ मंदिरामध्ये आ.राजूमामा भोळे यांनी पूजन करून आशीर्वाद घेतले. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे शुभाशीर्वाद घेऊन आ. राजूमामा भोळे यांनी प्रचार रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी आघाडी घेतली.
रॅलीमध्ये भाजपाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, विधानसभा प्रमुख विशाल त्रिपाठी, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, शिवसेना शिंदे गटाचे महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी, माजी महापौर ललित कोल्हे, महानगर प्रमुख संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लल्लन सपकाळे, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, आनंदा सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते.
रॅलीमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदराव मेटकर, भागवत भंगाळे, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी उपमहापौर सुनील खडके, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, माजी नगरसेवक अजित राणे, मनोज काळे, डॉ.वीरेन खडके, डॉ. वैभव पाटील, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भारतीताई सोनवणे, गायत्री राणे, सरिता नेरकर, जितेंद्र मराठे, भगत बालाणि, राजेंद्र घुगे पाटील, प्रवीण कोल्हे, मुकुंदा सोनवणे, दीपमाला काळे, मनोज काळे, बंटी खडके, जयेश भावसार, ललित चौधरी, आशिष सपकाळे, राहुल वाघ, चित्रा मालपाणी, दीप्ती चिरमाडे, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख राधेश्याम कोगटा, पियुष कोल्हे, माजी नगरसेवक ज्योती चव्हाण, गणेश सोनवणे, कुंदन काळे, महिला आघाडीचे शोभाताई चौधरी, आरपीआय आठवले गटाचे राजू मोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.