IBPS PO च्या 4135 पदांसाठी मेगा भरती, पदवीधर सुद्धा करू शकतात अर्ज
सरकारी बँकांमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनमधून प्रोबेशनरी ऑफिसर (IBPS PO रिक्रूटमेंट) पदासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 4,135 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट ibps.in ला भेट देऊन अर्ज करू शकता.
रिक्त पदे आणि आरक्षण : एकूण 4135 पदांची भरती केली जाईल. यात सामान्य श्रेणीच्या उमेदवारांसाठी 1600 जागा आहेत. ओबीसीसाठी 1102 जागा, एससीसाठी 679, एसटीसाठी 350 आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 404 जागा राखीव आहेत.
पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी.
वय मर्यादा : अर्जदाराचे वय 20 ते 30 वर्षे असावे. 1 ऑक्टोबर 2021 रोजी वयाची गणना केली जाईल. उमेदवाराचा जन्म 02 ऑक्टोबर 1991 पूर्वी आणि 01 ऑक्टोबर 2001 नंतर नाही असावा. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची तीन वर्षे आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट असेल.
या बँकांमध्ये भरती केली जाईल : या अधिसूचनेद्वारे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शुल्क : ८५०/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – १७५/- रुपये]
पूर्व परीक्षा दिनांक : ०४ व ११ डिसेंबर २०२१
मुख्य परीक्षा दिनांक : जानेवारी २०२२ रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा