केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सिनर्जी उत्साहात संपन्न
केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सिनर्जी उत्साहात संपन्न
जळगाव प्रतिनिधी
केसीईज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन सिनर्जी 2025 ची उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केसीईचे सचिव अँड. प्रमोद पाटील तसेच केसीईचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. शिल्पा बेंडाळे तसेच आय एम आर चे संचालक प्रा. बी व्ही पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन यामिनी भाटीया हिने केले तर प्रस्तावना सिनर्जी समन्वयक डॉ. शमा सराफ यांनी केली.
अँड प्रमोद पाटील, श्री शशिकांत वडोदकर, प्रा शिल्पा बेंडाळे आणि प्रा बी व्ही पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर नुकत्याच साजऱ्या झालेल्या “शिवजयंती” च्या पार्श्वभूमीवर, डॉ जुगलकिशोर दुबे यांचे “छत्रपती शिवाजी महाराज : ऐतिहासिक संदर्भ, सत्यता, कादंबर्या, चित्रपट आणि वास्तव ” या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले.
सिनर्जी मधील तीन दिवसात आय एम आर मध्ये एकूण अठरा स्पर्धा घेण्यात आल्या. पहिल्या दिवशी आज फेसपेंटींग, मॉक प्रेस कॉनफरन्स, डिजीटल पोस्टर, पोस्टर पेंटींग, मेहंदी, फुड कार्निव्हल, आणि गीतगायन स्पर्धा संपन्न घेण्यात आल्या. या स्पर्धांसाठी अँड कीर्ती पाटील, विशाखा पोतदार, अँड सागर चित्रे, रोहित मिश्रा, संदिप केदार, युवराज परदेशी, सरीता खाचणे, शिल्पा सफले, मिनाक्षी पाटील,, योगेश शुक्ल, हर्षल पवार, मिलन भामरे, पियुष बडगुजर यांनी काम बघितले.
दुसऱ्या दिवशी कविता वाचन , मॉक पार्लीमेंट, अॅड मॅड शो, डान्स इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या, या स्पर्धांसाठी अस्मिता गुरव, हर्षल पाटील, ऋषिकेश धर्माधिकारी, मोना निंबाळकर, अॅड. पद्मनाभ देशपांडे, पंकज व्यवहारे, संदीप केदार, यांनी काम बघितले.
तिसऱ्या दिवशी सकाळच्या रील फील, फोटोग्राफ, फॅशन शो ह्या स्पर्धा घेण्यात आल्या, यासाठी धनंजय धनगर, सुमित देशमुख, मानसी गगदानी, डॉ. तेजस राणे, सागर मुदंडा यांनी काम पाहिले. यानंतर वार्षिक बक्षीस वितरण समारंभ झाला, यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून अँड प्रकाश पाटील , उपाध्यक्ष, के.सी.ई. सोसायटी जळगाव, श्री. विशाल पाटील, (लोकशाही मराठी चॅनेलचे मॅनेजिंग एडीटर ) डॉ. नांद्रे, NSS अधिकारी , कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव उपस्थित होते.
या प्रसंगी सिनर्जि समन्वयक डॉ शमा सराफ यांनी संपुर्ण सिनर्जि स्पर्धांचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे आणि माजी विद्यार्थी विशाल पाटील यांनी इथल्याच सिनर्जितुन सुरु झालेली आपली भरारी आपले करीयर मधील यशस्वी अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. अध्यक्षीय समारोपात अँड प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना आभ्यास आणि इतर अँक्टव्हिटीमध्ये समन्वय साधत चालण्याचा सल्ला दिला.
या प्रसंगी सुत्रसंचलन मुस्कान आहुजा आणि आभार यामीनी भाटिया यांनी मानले . यशस्वी सिनर्जि स्पर्धा विजेते विद्यार्थी आणि वर्षभर विषेश कामगिरी करणार्या विद्यार्थांना डायरेक्टर अँप्रिसिऐशन आँवार्ड देऊन गौरवण्यात आले.
त्यात प्रामुख्याने आय एम आर युवा रेड क्रॉस क्लबसाठी अनुष्का मिश्रा, सांस्कृतिक कार्यासाठी कृष्णा चव्हाण, एनएसएससाठी सौरभ माळी , सौरभ शिंपी विद्यार्थी विकास आणि कल्याणासाठी, तन्वी वाघ आय एम आर रोटरॅक्ट क्लबसाठी आणि निर्माल्य संकलन आणि युवारंगसाठी अमित पाटील, एम बी ए साठी खुषी ललवाणी, एम बी ए फार्मा साठी बादल केसवाणी, एम सी ए साठी अक्षय खांडेकर, बी सी ए साठी हेमंत फुलमाळी, बी बी ए साठी मुस्कान आहुजा , आय एम सी ए साठी कुंतल पाटील. सिनर्जी 2025 साठी सर्व फॅकल्टी समन्वयक डॉ. ममता दहाड, डॉ. पराग नारखेडे, प्रा. अनिल मार्थी, डॉ वर्षा पाठक, प्रा.उदय चतुर, डॉ. अनुपमा चौधरी, प्रा. वर्षा झनके, डॉ संदिप घोडके, डॉ. दिपाली पाटील, डॉ धनश्री चौधरी, प्रा श्वेता फेगडे, प्रा. प्रियांका खरारे, प्रा सतिश दमाडे, नेहा ललवाणी, भाग्यश्री निशाने, डॉ. स्नेहा वालीवाडेकर, वैभव चत्रभुज, रोहीणी चौधरी, सेजल नेहेते, यांनी काम बघितले.