एका गानयुगाचा अस्त! स्वरसम्राज्ञी हरपली
मुंबई : आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे निधन झाले त्या 93 वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला.
दरम्यान, मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
2001 मध्ये त्यांच्यया संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत रत्न या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले एम एस सुब्बलक्ष्मी यांच्यांनंतर हा पुरस्कार पटकावणार्या दुसऱ्या गायिका आहेत. तर1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. फ्रान्स सरकारनेही त्यांचा लिजन ऑफ हॉनर या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बंगाल चित्रपट पत्रकार पुरस्कार 15 वेला तर फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार चार वेळा पटकावला. त्यांना फिल्मफेअर कडून दोनदा विशेष सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या मागे मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतातील अध्वर्यू दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत.
कुटुंबातील सर्वात मोठी कन्या असलीने त्याच्यावर लवकर जबाबदारी पडली. आपल्या वडिलांच्या मराठी संगीत नाटकात त्यांनी पाचव्या वर्षी काम सुरू केले.
वयाच्या 13 व्या त्यांनी किती हासाल या चित्रपटात नाचू या गडे खेळु सारी मनी हौस भारी हे गाणे म्हटले. मात्र त्याचा समावेश झाला नाही. 1942 मध्ये पाहिती मंगळागौर या सिनेमात त्यांनी छोटीशी भूमिकाही केली आणि नटली चैत्राची नवलाई हे गाणेही गायले. गजाभाऊ या मराठी चित्रपतात माता एक सुपुत की दुनिया बदल दे तू हे पहिले हिंदी गीत गायले.
मास्टर विनायक यांनी त्यांचे मुख्यालय लता दीदी 1943मध्ये मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास भिंडबझार घराण्याचे उस्ताद अमन अली खान यांच्याकडे सुरवात केली. वसंत जोगळेकर यांच्या आपकी सेवा मे (1946) पा लागून कर जोरी हे गीत त्यांनी गायले. त्याला दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते.1945 बडी माँ या चित्रपटात त्यांनी माता तेरे चारणोमे हरभजन म्हटले.
लता मंगेशकर यांचे प्रारंभिक जीवन :
लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथील मराठी भाषिक गोमंतक मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते, त्यामुळे लताजींना संगीताचा वारसा लहानपणापासूनच मिळाला. त्यांना लहानपणी “हेमा” या नावाने हाक मारली जायची, पण नंतर वडिलांनी “भाव बंधन” या नाटकाने प्रेरित होऊन त्यांचे नाव बदलून लता ठेवले.
लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे.
लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत.