DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

थरार…वाळूने भरलेला ट्रॅक्‍टर चढला रिक्षावर; महसूलच्‍या कर्मचारींकडून सुरू होता पाठलाग

जळगाव | प्रतिनिधी 

वाळू चोरीचे ट्रॅक्‍टर व डंपर नागरीकांच्‍या जीवावर उठल्‍याचा प्रत्‍यय आज देखील आला. वाळू उपसा बंद असताना चोरून उपसा सुरू आहे. अशात नदीतून उपसा करून जात असलेल्‍या ट्रॅक्‍टरचा अधिकारी पाठलाग करत असताना उभ्‍या रिक्षावर ट्रॅक्‍टर चढविले.

 

जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉपवर राष्ट्रीय महामार्गावर हा थरार आज सकाळी साडेअकराच्‍या सुमारास घडला. वाळूने भरलेल्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने शिवकॉलनीजवळ रिक्षाला (क्र.एमएच १९ व्ही ३४४१) जोरदार धडक दिली. त्याच वेळी काही अंतरावरून मुरूमाने भरलेला दुसरा ट्रॅक्टर समोरून येत असतांना वाळूच्या ट्रॅक्टरने रिक्षाला धडक देत थेट मुरुमाच्या ट्रॅक्टरलाही धडक दिली. वाळूच्या ट्रॅक्टरचा महसूल विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी पाठलाग करत असल्याने पकडले जावून या भितीने वेगाने ट्रॅक्टर चालविण्याच्या नादात हा अपघात घडला.

रिक्षा चालक बचावला

सदर घटनेत रिक्षाचा चक्काचूर झाला. हा विचित्र अपघात घडला त्यावेळी रिक्षाचालक मजरखान सखावत खान (वय ३०) हे सुदैवाने रिक्षात बसलेले नव्हते. ते त्यांच्या रिक्षाच्या बाजूला उभे असल्याने बचावले. अपघातानंतर धडक देणार्‍या वाळू ट्रॅक्टरवरील चालकाने उडी मारली. अन् ट्रॅक्टर घटनास्थळावर सोडून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी जावून वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.