DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पौष्टिक तृणधान्य खा,व निरोगी राहा – तालुका कृषी अधिकारी डाॅ. अभिमन्यू चोपडे.

राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम..... जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य महाविद्यालय जामनेर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना ( NSS ) विशेष श्रमसंस्कार शिबीर कोदोली येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी डाॅ. अभिमन्यू चोपडे होते. राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवकांना मार्गदर्शन करतांना ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा यांसारख्या पौष्टिक तृणधान्याचा रोजच्या आहारात सर्वांनी समावेश केला पाहिजे. ही पौष्टिक तृणधान्ये ग्लुटेन मुक्त असून ती कॅल्शियम, लोह, झिंक, आयोडीन इत्यादी सारख्या सुक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असतात. ही तृणधान्ये डायरिया, बद्धकोष्ठता, आतड्यांच्या आजारास प्रतिबंध करतात.पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषि सहाय्यक सुनिल गायकवाड यांनी शेतीविषयक आणि कृषिविषयक विविध योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तथा मंडळ कृषि अधिकारी अशोक वाळके यांनी रासेयो स्वंयसेवक यांना पौष्टिक तृणधान्य प्रतिज्ञा देऊन सांगता केली. उपस्थित व्ही. टी परखड ( कृषि पर्वेक्षक), जे. बी. राठोड (कृषि सहाय्यक), ग्रामसेवक शिवाजी अहिरे, प्रा. अमोल माळी ( रासेयो कार्यक्रम अधिकारी ),प्रा.शिवानी चौधरी ( रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ), रुपेश बिऱ्हाडे ( समुह सहाय्यक ),यावेळी सर्व स्वंयसेवक उपस्थित होते. याच प्रमाणे मिलिंद पाटील कृषि सहाय्यक यांनी सुत्रसंचालन केले तर अमोल माळी रासेयो यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.