DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अमळनेरातील कुख्यात गुंड दाऊदवर ‘एमपीडीए’ची कारवाई !

अमळनेर :  शहरातील पोलिस दप्तरी कुख्यात म्हणून ख्याती असलेल्या शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (वय २४, रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारीचे मागे अमळनेर ता. अमळनेर) याच्यावर एमपीडीएची (स्थानबद्ध) (Mpda Amalner) कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख याच्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला ०३ खुनाचा प्रयत्न, ०९ घरफोडी, ०१ दरोडा, ०५ जबरी चोरी, ०६ चोरी, ०१ पोलीस रखवालीतून पळून जाणे, ०१ सरकारी नोकरावर हल्ला, ०१ आर्म अॅक्ट असे एकूण २७ गुन्हे व करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा समावेश असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी संशयीतावर कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, जळगाव व जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंजूर करवून त्यास MPDA कायद्याअंतर्गत नाशिक सेन्ट्रल कारागृहात स्थानबद्धतेसाठी पाठविण्यात आले आहे.

 

गुन्हेगारावर कठोर कारवाई झाल्याने अमळनेरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आज रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख यास स्थानबध्दतेचे आदेश जारी केलेत. पोलीस अधीक्षक एम राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पो. अधिक्षक चाळीसगाव रमेश चोपडे व उपविभागीय पो.अधिकारी अमळनेर भाग राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील व अमळनेर पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जय शिंदे यांनी जळगाव एलसीबी व अमळनेर पोलिसांचे संयुक्त पथक तयार केले होते. त्यात पोलीस उप निरीक्षक अनिल भुसारे, पोना/दिपक माळी, पोना/रविंद्र पाटील, पोना/किशोर पाटील, पोना/सिध्दार्थ शिसोदे सर्व नेम.अमळनेर पो.स्टे. व सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ /सुनिल दामोदरे अश्यांनी आज शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम याला ताब्यात घेवून त्यांची जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे मध्यवर्ती कारागृह नाशिक याकारागृहात रवानगी केली आहे.

दरम्यान, याआधी राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ (20, पारधीवाडा सुभाष चौक, अमळनेर) याच्यावर ५ जानेवारी रोजी एमपीडीए  (स्थानबद्ध) (Mpda Amalner ) ची कारवाई करण्यात आली आहे. दादू निकुंभविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म अ‍ॅक्ट, दुखापत आदी प्रकारचे तब्बल 11 गुन्हे अमळनेर पोलिसात दाखल होते. मगील तेरा दिवसा दुसरी मोठी कारवाई झाल्यामुळे अमळनेरातील गुन्हेगारी क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.