DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन

जळगाव | प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर आधारित राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वासोबतच स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अनमोल आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच आपला समृद्ध इतिहास पुढच्या पिढीसमोर ठेवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत शाळा अथवा महाविद्यालय आपल्या संघाची प्रवेशिका पाठवून सहभाग नोंदवू शकणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित वा त्यांच्या आयुष्यातील एका प्रसंगावर नाटिका तयार करणे अपेक्षित आहे. किमान ५-७ मिनिटांच्या या नाटिकेचे ध्वनिचित्रमुद्रण (व्हिडीओ) तयार करून दि. ३१ जुलै पूर्वी पाठविणे अपेक्षित आहे. स्पर्धेचा निकाल दि.१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऑनलाईन कार्यक्रमात घोषित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम पाच यशस्वी स्पर्धक संघांना रोख पारितोषिके देण्यात येतील. अधिक माहितीसाठी गिरीश कुळकर्णी (९८२३३३४०८४) यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.