टीव्ही अभिनेत्रीने संपवलं जीवन; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिलं कारण
मुंबई : मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. कन्नड टीव्ही अभिनेत्री सौजन्या (Actress Soujanya) हिचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या बंगळूरूमधील घरात सापडला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. म्हणूनच पोलिसांनी दरवाजा तोडून अभिनेत्रीचा मृतदेह बाहेर काढला आहे.
अभिनेत्री सौजन्याने साडीची फास बनवून स्वतःला फाशी लावून घेतली होती. तिच्या पायावरील टॅटूच्या खुणामुळे अभिनेत्रीची ओळख झाली आहे. पोलिसांनी सौजन्याच्या खोलीतून एक सुसाईड नोटही जप्त केली. पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीत अभिनेत्रीने तिच्या मृत्यूसाठी कोणालाही दोष दिला नाही. सौजन्या बंगळूरूच्या दक्षिण जिल्ह्याच्या कुंबलगोडू येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. सुसाईड नोटमध्ये तिने घेतलेल्या निर्णयाबद्दल तिने आपल्या पालकांची माफी मागितली आहे.
नैराश्याने ग्रस्त होती अभिनेत्री
सौजन्याच्या खोलीतून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले आहे की, “माझं प्रिय कुटुंब, मी माझ्या या पावलाबद्दल माफी मागतेय.” या नोट्समध्ये 27, 28 आणि 30 सप्टेंबर या तीन तारखांचा उल्लेख आहे. यासोबतच अभिनेत्रीने आपल्या चिठ्ठीमध्ये हे मान्य केले आहे की, ती नैराश्याने ग्रस्त आहे. सौजन्याने सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले आहे की, तिला कोणताही आजार नव्हता, पण ती मानसिक समस्यांनी ग्रस्त होती. यासह, अशा काळात ज्यांनी त्याला पाठिंबा दिला त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.
https://d-11705830112473339049.ampproject.net/2109102127000/frame.html
पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले
अभिनेत्री सौजन्याच्या आत्महत्येनंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ते अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या मित्रांना काही प्रश्न विचारत आहे. पोलीस या प्रकरणात जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, अभिनेत्री स्वतः या स्थितीसाठी जबाबदार आहे की, तिला यासाठी उद्युक्त केले गेले होते.
याआधी ‘या’ कन्नड अभिनेत्रींनी केली आत्महत्या
सौजन्या कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने टीव्ही तसेच दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही बातमी कन्नड मनोरंजन विश्वासाठी अतिशय धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वी कन्नड इंडस्ट्रीची आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री रमैया हिने देखील आत्महत्या केली होती.
मानसिक आरोग्यामुळे उचलले टोकाचे पाऊल
सौजन्या प्रमाणेच अभिनेत्री जयश्री रमैया हिने देखील मानसिक आरोग्य आणि संघर्षामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले होते. या वर्षाच्या सुरुवातीला ‘बिग बॉस कन्नड’ फेम अभिनेत्री चैत्र कुटूर हिनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.