डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर करा ‘हे’ घरगुती उपाय
दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क
जेव्हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे (डार्क सर्कल) येतात तेव्हा एखाद्या व्यक्तीला आजारी असल्यासारखे वाटू लागले. स्त्री असो वा पुरुष, काळी वर्तुळे आपले सौंदर्य कमी करत असतात. ताण, योग्य वेळेत जेवण न करणे, पुरेशी झोप न घेणे, योग्य आहार घेणे, जास्त मोबाईलचा वापर करणे यामुळे डार्क सर्कल येत असतात.
मार्केटमध्ये डार्क सर्कल घालवण्यासाठी सध्या बाजारात खुप गोष्टी उपलब्ध आहे, पण त्याचा स्कीनवर वाईट परीणाम होऊ शकतो. पण आम्ही तुम्हाला आज काही खास उपाय सांगणार आहोत. जर तुमच्या डोळ्यांजवळ काळी वर्तुळे असतील तर तुम्ही ती फक्त २ दिवसात कमी करू शकता. घरात ठेवलेल्या काही गोष्टी लावल्याने काळी वर्तुळे २ दिवसात कमी करु शकतात.
१. डार्क सर्कलवर एलोवेरा जेल लावा-
एलोवेरा जेल एका भांड्यात ठेवा आणि कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावा. सुमारे १० ते १५ मिनिटांनंतर, ओल्या टॉवेलने किंवा ओल्या वाइपने जेल पुसून टाका. असे दिवसातून दोनदा करा. यामुळे फक्त २ दिवसात तुम्हाला फरक दिसेल.
२. ताक आणि हळद-
हळद आणि ताक एकत्र करून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावा. पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा काळजीपूर्वक धुवा. २ दिवसात काळी वर्तुळे दूर करण्यासाठी हा घरगुती उपाय दिवसातून दोनदा करा. यामुळे डोळ्यांखालील त्वचा टवटवीत राहते आणि डार्क सर्कल कमी होते.
३. ग्रीन टी बॅग्ज –
सर्व प्रथम, एका पॅनमध्ये पाणी गरम करा आणि त्यात ग्रीन टी बॅग भिजवा. काही वेळाने ग्रीन टी बॅग पाण्यातून काढून फ्रीजमध्ये थंड होऊ द्या. ती बॅग थंड झाल्यावर थोडावेळ डोळ्यांवर ठेवा आणि थंडावा जाणवेल. यामुळे काळी वर्तुळे कमी होतात.