DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रा.सुजाता निकम यांना छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार प्रदान

अमळनेर । प्रतिनिधि नुरखान

येथील प्रा सुजाता निकम यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरम च्या वतीने छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अमळनेर येथील रहिवासी प्रा सुजाता निकम-गाढे या नवलनगर येथील के एन बी कला महाविद्यालयात मुख्यग्रंथापल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहे,त्यांनी स्पर्धा परीक्षा विभागाच्या माध्यमातून करिअर गाईडन्स उपक्रम राबविल्याने अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी उपयोग झाला आहे. कोरोनाच्या काळात घर पोच पुस्तक सेवा पुरवून विद्यार्थ्याच्या अध्ययनात खंड पडू दिला नाही,आपल्या ग्रंथालयात नसलेले मात्र विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तके इतर महाविद्यालयातुन उपलब्ध करून देत असल्याने विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक मिटवत आहे.चालू घडामोडी वर आधारित जनरल, मॅगझीन सह कथा-कादंबरी, अभ्यासक्रम पूरक पुस्तके आपल्या ग्रंथालयाच्या माध्यमातून सहज उपलब्ध करून देत ग्रामीण भागातील सर्व स्तरातील वाचकांना ज्ञानाचा भांडार उपलब्ध करून आपली सामाजिक बांधिलकी जपत असल्याने याची दखल केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय सलग्न नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम ने घेत दि 31 जुलै रोजी धुळे येथिल मराठा सेवा संघ कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रा सुजाता निकम-गाढे यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रा.सुजाता निकम यांना छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार प्रदान

याप्रसंगी आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे,जिजाऊ ब्रिगेड च्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा डॉ वैशाली पाटील,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कैलास चौधरी यांच्या उपस्थितीत पार पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे नॅशनल डायरेक्टर जनरल गोरख देवरे,ऍडिशनल डायरेक्टर प्रमोद पाटील,सांजदैनिक चे संपादक दीपक गवळी,जुबेर शेख,राम बहारे,प्रिया पाटील आदींनी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.