भारतातील महान क्रांतिकारक शहीद दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार व सन्मान
भारतातील महान क्रांतिकारक शहीद दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार व सन्मान
सत्कर्म करण्याची उर्मी सत्कारा पर्यंत नेते…डी ए धनगरकोणतेही कार्य करतांना जर मनापासून केल तर चांगले काम होते त्यालाच सत्कर्म असे म्हणतात. सत्कर्म करण्याची वृत्ती अंगी बाणवली तर समाज त्या कामाची दखल घेतो. असे गौरवोद्गार
. महान क्रांतिकारकांच्या शहीद दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार समारंभ वेळी डी ए धनगर यांनी काढले.
शिरुड येथे भारतातील महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी देशासाठी सर्वस्वाचे बलिदान केले. या शहीद दिनाचे औचित्य साधून श्री दत्त सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत रघुनाथ पाटील यांच्या मनोदया नुसार आपल्या शिरूड गावासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक,सामाजिक, क्रीडा, आरोग्य, सौरक्षण व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचे तसेच वाचन संस्कृतीचे जतन व्हावे वाचन संस्कृती समाजामध्ये रुजावी व शैक्षणिक संगोपनात वाढ व्हावी या दृष्टीने ५ वाचक मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमा प्रसंगी शिरुड गावचे प्रथम नागरिक सरपंच गोविंदा सोनवणे, उपसरपंच सौ कल्याणी पाटील, मा.जी सरपंच भाईदास पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थित ग्रामविकास शिक्षण संस्थेचे संचालक श्री नानासो. जयंतराव पाटील, पो.पा विश्वास महाजन व्ही.झेड. पाटील हायस्कूल चे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे व शिक्षक बांधव व जि. प.मराठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.सैनाद खाटीक, जि.प मुख्याध्यापक आर. टी.भदाने व शिक्षक बांधव भगिनी तसेच साने गुरुजी शाळेचे शिक्षक डी.ए.धनगर तसेच स्थलांतरित ग्रामसेवक गुलाबराव सूर्यवंशी व नवीन दाखल झालेल्या ग्रामसेविका सौ. सोनी पाटील, डॉ.अतुल चौधरी आरोग्यसेविक अनिता पाटील, आशा स्वयंसेविका कल्पना पाटील,पूनम पाटील अंगणवाडी सेविका सीमा कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला पाटील, अलका पाटील, सुरेखा पाटील व गावातील मान्यवर दिलीप पाटील, अशोक महाजन, अमीन खाटीक, सुकलाल पाटील, प्रफुल्ल पाटील, सतीश पाटील, योगेश पाटील, विठ्ठल पाटील, रवींद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, कल्पेश पाटील, रजनीकांत पाटील, सागर पाटील, वसंत पाटील, विद्या पाटील सर्व ग्रामस्थ शिरूड यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन आयोजक संस्था अध्यक्ष श्री शशिकांत रघुनाथ पाटील यांनी सर्व मान्यवर व सत्कार मूर्ती व कर्मचारी व ग्रामस्थ वर्ग यांचे आभार मानले. कार्यक्रमा प्रसंगी आदर्श शिक्षक अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.