मोठ्या पगाराची अपेक्षा असेल तर ‘१० वी’ नंतर करा हे कोर्स
दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : आजकाल अनेक विद्यार्थ्यांना पैसे कमवण्याची इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघ्याची नसते. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागचं एक प्रमुख कारण असू शकतं. दहावीनंतर हे शक्य आहे.
अभियांत्रिकी डिप्लोमा
अनेक संस्था आणि पॉलिटेक्निक महाविद्यालये 10वी नंतर अभियांत्रिकी पदविका देतात. अभियांत्रिकी पदविका प्रमाणपत्र घेतल्यावर, एखाद्याला अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित मध्यम स्तराची नोकरी सहज मिळू शकते.
ITI (औद्योगिक प्रशिक्षण)
10वी बोर्ड परीक्षेनंतर ITI हा देखील एक चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, कारपेंटर, मेकॅनिक, स्टेनो, कॉम्प्युटर असे अनेक विषय आहेत. हा कोर्स करून तुम्ही तुमचे काम सुरू करू शकता.
स्टेनोग्राफी आणि टायपिंग
स्टेनोग्राफी आणि टायपिंगचा डिप्लोमा कोर्स 10 वी नंतर करता येतो. न्यायालये आणि इतर अनेक सरकारी कार्यालयांमध्ये अशा रिकाम्या जागा भरत राहतात, ज्यासाठी स्टेनोग्राफीचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.