DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

म्हणून ‘या’ लोकांना डास जास्त चावतात; जाणून घ्या सविस्तर…

मुंबई – हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये डासांमुळे सारेच त्रस्त असतात. विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देणारे हे दिवस असतात. विशेषतः पावसाळ्यात तर डास घरातच ठाण मांडून असतात. मात्र ते घरातील प्रत्येकाला ते चावतात असे नाही. डासही रक्त पिण्यासाठी आवडीची त्वचा निवडतात. असे का होते, हे आज जाणून घेऊया.

२०१४ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील किटकांचे आणि डासांचे तज्ज्ञ डॉ. जोनाथन डे यांनी हे कारण स्पष्ट केले होते. त्यात त्यांनी आपल्या शरीराच्या कुठल्या गोष्टी या डासांना आकर्षित करतात, हे देखील सांगितले होते. आपल्या त्वचेवर नैसर्गिकदृष्ट्या अनेक प्रकारच्या रसायनांची निर्मिती होत असते.

त्यात ज्या लोकांची त्वचा लॅक्टीक असीड जास्त प्रमाणाक निर्माण करते त्यांना डास जास्त चावतात. लॅक्टीक असीड डासांना आकर्षित करीत असते. याशिवाय तुमचा रक्तगट कोणता आहे, यावरही डासांचे आकर्षित होणे अवलंबून असते. ओ ब्लड ग्रुप असलेल्या लोकांकडे डास विशेषत्वाने आकर्षित होतात. डास हे कार्बनडाय आक्साईडचा वापर करून आपले लक्ष्य निश्चित करीत असतात.

गर्भवतींना त्रास
गर्भवतींना आणि वजनी लोकांचा मेटाबॉलिक रेट जास्त असतो. त्यामुळे डास त्यांच्याकडे आकर्षित होतात. याशिवाय गडद रंगांचे कपडे घालणेही डासांना आकर्षित करू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तापमान जास्त
ज्यांच्या शरीराचे तापमान जास्त आहे, त्यांनाही डास जास्त चावतात असे डॉ. जोनाथन यांचे म्हणणे आहे. बीअर पिणाऱ्यांचा घाम डासांना आकर्षित करतो. अश्यात तुमच्या शरीरातून स्वाभाविकदृष्ट्याही घाम आला तरीही डास आलेच समजा.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.