लढा भ्रष्टाचाराचा होता की बदनामीचा..नुसता बोलाचा भात अन बोलाचीच कढी तर नव्हे..
अमळनेर :- लढा भ्रष्टाचाराचा होता की राजकारणाचा होता. बदमामीचा तर नव्हे ना, मग थांबला कुठे शिरूड.. येथील रहिवासी वसंतराव पाटील यांनी शहरातील पंचायत समिती समोर गेल्या दोन महिन्यांपूर्वी छावा संघटनेचे आंदोलन सुरू असताना सांगितले होते की, पंचायत समिती सभापती त्रिवेणीबाई पाटील यांचा मुलगा माजी सभापती शाम अहिरे यांनी शिरूड गावात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. असे सांगत याचे जिवंत उदाहरण मी आहे. असे त्यांनी स्पष्ट देखील केले होते. या बाबत माजी सभापती श्याम अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर बाबतची सर्व माहिती पूर्णपणे खोटी असून समाजात माझी बदनामी केली जात असून मला राजकारणातून अलिप्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जर मी एकही रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल तर वसंत पाटील यांनी गावात ग्रामसभा घेऊन जनतेसोमोर त्यांनी माझे पुरावे सिद्ध करून दाखवावे. जर त्यांनी एकही रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध केला तर मी राजकारणातून निवृत्त होऊन जाईल. असे सांगत माझी ही बदनामीच आहे.
या बाबत बदनामी करणारे वसंत पाटील यांच्यावर मी निश्चितपणे कारवाई करून गुन्हा दाखल करणार असे त्यांनी सांगितले होते. याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या होत्या. नेमकं होणार काय गुन्हा दाखल की भ्रष्टाचार उघडकीस होणार.
या गोष्टीला गेले दोन महिने होऊन देखील याबाबत नंतर माजी सभापती श्यामा अहिरे यांनी आरोपकर्त्या वसंत पाटील यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही.
तसेच कोट्यावधीचा भ्रष्टाचार सांगत तालुक्यात गाजावाजा करणारे वसंत पाटील यांनी शाम अहिरे विरुद्ध कुठलाही भ्रष्टाचार सिद्ध न करता कुठलेही एक रुपयाचे पुरावे समोर का आणले नाही. असा प्रश्न आज खंबीरपणे उभा आहे. या बाबत तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
आरोपकर्त्यानी आद्यपही आरोप का सिद्ध केला नाही. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून बदनामी म्हणणारे माजी सभापती शाम अहिरे यांनी आजवर आरोपी कर्त्यावर कारवाई का केली नाही. असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत दोघांमध्ये काही मिलीबगत तर झाली नसावी अशी चर्चा देखील समाज बांधवांकडून ऐकण्यास मिळत आहे.
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसऱ्यावर निशाणा साधणे चुकीचे स्पष्ट करण्याची अथवा समोर बोलण्याची हिंमत का होत नाही. माजी सभापती शाम अहिरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचा खुलासा वसंतराव पाटील करणार कधी
आणि बदनामी सांगणारे माजी सभापती आरोपकर्त्या वसंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करणार कधी. नुसताच बोलाचा भात आणि बोलाचीच कढी. असे तर या दोघांमध्ये नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
कर नाही त्याला डर कशाला? या उक्तीप्रमाणे दोघांनीही वागणे उचित ठरेल. जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर होईल तसेच जनतेचा विश्वास निर्माण होईल अन्यथा हा दोघांवरही सामान्य माणसाने विश्वास कसा ठेवावा हा प्रश्न निर्माण होतो आहे.. *_रजनीकांत पाटील*_