DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वाघूर धरण जलपूजनाचा तांबे दाम्पत्याला दिला मान

महापौर सौ.जयश्री महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे मंगळवार, दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी 100 टक्के पूर्ण भरले. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज गुरुवार, दि. 9 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, शिवसैनिक श्री.गजानन मालपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणस्थळी मेहरुणमधील रहिवासी श्री.युवराज तांबे व सौ.वंदना तांबे या दाम्पत्याला जलपूजनाचा मान देण्यात आला. त्यानंतर तांबे दाम्पत्याने सपत्नीक साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले. 

वाघूर धरण जलपूजनाचा तांबे दाम्पत्याला दिला मान
वाघूर धरण जलपूजनाचा तांबे दाम्पत्याला दिला मान

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व केमिस्ट श्री.श्यामकांत भांडारकर, विद्युत अभियंता श्री.विलास पाटील यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी तांबे दाम्पत्यासह महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव 100 टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुणदेवताचरणी लीन होऊन केली. वाघूर धरणाचे बांधकाम 1978 मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते तीन वेळा 100 टक्के भरले आहे.   

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.