DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश!

गांधी रिसर्च फाऊंडेशन व परिवर्तन आयोजित 'बंदे में है दम' संगीतमय मैफिलीतुन महात्मा गांधीजींना अभिवादन

संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश!

गांधी रिसर्च फाऊंडेशन व परिवर्तन आयोजित ‘बंदे में है दम’ संगीतमय मैफिलीतुन महात्मा गांधीजींना अभिवादन

जळगाव  प्रतिनिधी – महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्व संध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’ हा संगीतमय कार्यक्रम महात्मा गांधी उद्यान येथे करण्यात आले. महात्मा गांधी अनेक समज गैरसमज, अनेक माहीत नसलेल्या गोष्टी उलगडून सांगणारी, महात्मा गांधीजींचा शोध घेणा-या एक सुंदर संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डॉ. प्रदिप जोशी, अनिष शहा, स्वरुप लुंकड, अनिल कांकरिया, डॉ. अश्विनी देशमुख, डॉ. राधेश्याम चौधरी, सर्व सेवा समितीचे रत्नाकर पांडे, अँड.जमिल देशपांडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे शब्दगंध दिवाळी अंक देऊन सन्मानित केले गेले. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे कार्यक्रमाच्या मध्यांतरात उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या जीवनावर व कार्यावर नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याच धोरणाच्या अंतर्गत पुण्यतिथीच्या निमित्ताने परिवर्तनच्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम सादर झाला.

‘वंदे मातरम्’ने सुरवात झाली. सत्य अहिंसेची शिकवण देणारे..मानवतेचा प्रकाश दिसतो, सत्याग्रही नव नगर निघाले हि कविता सादर केले. भेटी लागे जीवा.. सावळे सुंदर रूप मनोहर..विठ्ठल नामाचा रे टाहो.. या रचना वरूण नेवे यांनी सादर केले. ‘मै तो मेरी पास में हे’ आणि ‘वैष्णव जन तो तेने’ हा गांधीजींना प्रिय अभंग सुदिप्ता सरकार यांनी सादर केला. ‘दे दे हमें आझादी साबरमती के संत… रघुपति राघव राजाराम पतीत पावन सिताराम.. ही रचना श्रध्दा कुलकर्णी यांनी सादर केली. अवघा रंग एक झाला.. अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम.. ही रचना अंजली धुमाड यांनी सादर केली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.

Divyasarthi News WhatsApp Group