DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये जळगाव रनर्स ग्रुपच्या 80 धावपटूंचा सहभाग

जळगाव – रनर्स ग्रुपच्या किमान 60 सदस्यांनी गेल्या 2 महिन्यापासून टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी जळगाव शहर ,बहिणाबाई विद्यापीठ ,मेहरूण तलाव ट्रॅक याठिकाणी दररोज रनिंगचा सराव केला तसेच या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 3 ते 4 महिन्यापूर्वी नोंदणी आवश्यक असते टाटा मुंबई मॅरेथॉन जगातील नामांकित मॅरेथॉनपैकी एक आहे.यात यावर्षी 55 हजार स्पर्धक जगभरातून सहभागी झाले होते त्याचाच एक भाग म्हणून जळगाव रनर्स ग्रुपचे 50 पुरुष व 10 महिला यांनी यात सहभाग नोंदविला. यापैकी 40 जण हे पहिल्यांदा टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले .42 किलोमीटर फुल मॅरेथॉन तसेच २१ .किलोमीटर हात मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग नोंदविला.
जास्तीत जास्त वेगाने धावत स्पर्धा पूर्ण करणे हे खरोखर आव्हानात्मक आहे.असा आत्मविश्वास आपल्यात असणे जरुरीचे आहे. 8 आठवडे आधी जळगाव शहरात व त्या वातावरणात शारीरिक कष्टाचा सराव तर केलाच पण मुंबई टाटा मॅरेथॉन नतर पुढील मॅरेथॉनचे मानसिक आव्हान पेलण्यासही समर्थ झालो.यात एक वैशिष्ठये असे होते कि जळगावच्या वैशाली बडगुजर या महिलेने चक्क साडी घालून २१ किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली असे प्रतिपादन गुरुप्रसाद तोतला व किरण बच्छाव यांनी सांगितले .
उत्कृष्ट आयोजनासाठी देखील ही मॅरेथॉन संस्मरणीय ठरलीय कारण वाटेत ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक, दर सुमारे 3 किमीनंतर पाण्याचे ठिकाण, इतर पोषक पेये, केळी, इत्यादींची व्यवस्था चोख होती. वाटेतील मुंबईकर नागरिक इ. अनेक व्यक्ती आनंदाने टाळ्या वाजवत धावपटूंचा उत्साह वाढवत होते आयोजकांचेही सर्व धावपटूंवर लक्ष्य होते व आवश्यक ती वैद्यकीय मदतही पुरवली जात होती. याशिवाय स्थानिक पोलीस प्रशासन व मुंबई मनपा व टाटा सन्स चे कर्मचारी ,अधिकारी देखील धावपटूंना विशेष प्रोत्साहित करीत होते व त्यांनी कायदा व सुव्यवस्था अतिशय चोखपणे बजावली असे सर्व धावपटूंनी सांगितले.
यशस्वी सर्व धावपटूंचे जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव, डॉ. प्रशांत देशमुख , डॉ.विवेक पाटील , विक्रांत सराफ ,अविनाश काबरा ,निलेश भांडारकर ,डॉ.राहुल महाजन,उमेश महाजन , डॉ. रवी हिरानी यांनी अभिनंदन केले

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.