DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

दुष्काळग्रस्त अमळनेर मतदारसंघाची आमदार पाटलांकडून पाहणी

पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या महसूल प्रशासनाला सूचना

अमळनेर : यंदा पावसाअभावी खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाल्याने अडचणीत सापडलेल्या अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या २५ सप्टेंबर रोजीच्या शासन आदेशानुसार अमळनेर मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त भागात समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेतली.

२०२६ च्या खरीप हंगामात पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुष्काळग्रस्तांच्या यादीत मतदारसंघाचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीसह विविध सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी आमदार अनिल पाटील यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.

दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान आमदार पाटील यांनी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. पंचनाम्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दरम्यान, मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले.

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.