भाजपच्या वतीने उद्या जळगावात राष्ट्रीय इनोव्हेशन चॅलेंज
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम; ४७ महाविद्यालयांचे स्टार्टअप सहभागी होणार
जळगाव : भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय इनोव्हेशन चॅलेंजचा जिल्हास्तरीय कार्यक्रम शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता बीएसएनएल कार्यालयामागील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता, संशोधनवृत्ती आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील ४७ महाविद्यालयांचे स्टार्टअप सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाला जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि महापौर दीपमाला काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर, संशोधक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भाजपचे उपाध्यक्ष व सेवा संकल्प अभियान प्रमुख दीपक परदेशी, कार्यक्रम संयोजक संतोष इंगळे आणि रवींद्र फालक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. जिल्हा प्रसिद्धिप्रमुख मनोज भांडारकर यांनी नागरिकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.