DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

डॉ. लीना पाटील यांना ‘प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल; नागपूर येथे १३ नोव्हेंबरला होणार सन्मान सोहळा

जळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्याच्या वतीने जळगाव शाखेच्या डॉ. लीना पाटील यांची ‘प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड २०२५-२६’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान, वैद्यकीय बांधिलकी आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद सचिव डॉ. विक्रांत देसाई यांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे डॉ. लीना पाटील यांना पुरस्कार निवडीची माहिती दिली. या निवडीमुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.या पुरस्काराचे वितरण १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता नागपूर येथील उत्तर अंबाझरी रोडवरील आयएमए हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मास्टाकॉन २०२६’ परिषदेदरम्यान होणार आहे. या सोहळ्यात आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून डॉ. लीना पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे.वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या कार्याची दखल घेणे, त्यांच्या सेवाभावी वृत्तीला प्रोत्साहन देणे आणि संघटनेच्या कार्यात योगदान देणार्‍या सदस्यांचा सन्मान करणे, हा या पुरस्कारामागील उद्देश आहे. डॉ. लीना पाटील यांच्या निवडीमुळे जळगाव शाखेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या पुरस्काराबद्दल माजी खा. डॉ. उल्हास पाटील डॉ. अनिल पाटील डॉ. शशिकांत गाजरे डॉ. स्नेहल फेगडे डॉ. विलास भोळे डॉ.अनिता भोळे डॉ. धनंजय बोरोले डॉ. पंकज शहा आणि टीम आय एम ए तसेच वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. लीना पाटील यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.