DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आनंद हा शोधायचा नसतो, तो जगण्यातून अनुभवायचा असतो : प्रा. डॉ. जतीन मेढे

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत आनंदी जीवनाचा मंत्र; वाढदिवस असलेल्या सभासदांचा सत्कार

भुसावळ  : श्रद्धा आणि कर्म यांचा योग्य समन्वय साधला, तर जीवन आनंदमय होण्यास वेळ लागत नाही. ज्येष्ठ नागरिकांनी आनंदाने जीवन जगण्याची कला आत्मसात करून उर्वरित आयुष्य इतरांना आनंद देण्यात व्यतीत करावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी केले.

ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा रिंग रोड, भुसावळ येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘आनंदी जीवन कसे जगावे’ या विषयावर प्रा. डॉ. मेढे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. जतीन मेढे, संयोजक डॉ. नितू पाटील, अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, संजय चौधरी आणि भानुदास पाटील उपस्थित होते. विश्वप्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

आनंदी जीवन जगण्याची कला आत्मसात करा

मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मेढे म्हणाले की, आनंदाचे क्षणिक, समाधान देणारे आणि कायमस्वरूपी असे विविध प्रकार आहेत. कायमस्वरूपी आनंद मिळविण्यासाठी जगण्याची कला आत्मसात करणे आवश्यक आहे. हीच कला आपल्या नातवंडांनाही शिकवावी. सुख ही शारीरिक क्षमता असून आनंद ही मानसिक अवस्था आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य असले, तरी त्याच्या भीतीने जगण्याऐवजी मिळालेल्या सुंदर जीवनाचा आनंद घ्यावा. ज्या परमेश्वराने आपल्याला जीवन दिले, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे, असेही त्यांनी सांगितले. विविध संत, महात्मे आणि समाजसुधारकांच्या उदाहरणांतून त्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना अंतर्मुख केले.

वाढदिवसानिमित्त सभासदांचा सत्कार

या सभेत मोतीराम चौधरी, यशवंत वारके, पंडित पाटील, रेखा चौधरी, मीनाक्षी भोळे, दशरथ राणे, प्रकाश चौधरी आणि सुहास मुजुमदार या वाढदिवस असलेल्या सभासदांचा उपरणे व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला सुरेश बेलसरे, पुंजो भारंबे, रमण भोगे, प्रमोद बोरोले, विजया भारंबे, ज्योती चौधरी, राजाराम चौधरी, चंद्रकांत चौधरी, दिलीप चौधरी, प्रमिला चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान चऱ्हाटे, लोटू फिरके, अलका इंगळे, सोपान नेमाडे, अशोक नेहेते, विजया पाटील, वैशाली तुकाराम पाटील, ज्ञानदेव पाटील, अनिल पाटील, सुलोचना पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इंदू पाटील, विकास राणे, गणेश सरोदे, इंदुबाई सपकाळे, रजनी तळेले, विश्वनाथ वाणी, छबुताई झांबरे, अरुण धांडे यांच्यासह संघाचे अनेक सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जंगले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश पाटील, संजय चौधरी, प्रभाकर झांबरे, अशोक नेहेते, धनराज पाटील, भास्कर खाचणे, भानुदास पाटील आणि सुनील सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. विश्वकल्याण साधणाऱ्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.