DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

हिवरखेडा त.वा.ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाचा गफला – जनार्धन कुमावत यांची तक्रार

 जामनेर/उपसंपादक -शांताराम झाल्टे। दि-२१ जामनेर तालुक्यातील हिवरखेडा त.वा.येथे ग्रामपंचायतचा मनमानी कारभार व मागील सरपंचाने अपहार केल्याची तक्रार जनार्धन कुमावत यांनी केली आहे . २०१९/२०२० या अंतर्गत ग्रामपंचायतने गावात कामे न करता निधी काढण्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आज रोजी केल्या.   जामनेर तालुक्यातील हिवरखेडा त.वा.येथे समशान भूमिजवळ सुशोभीकरण नसल्यावर सुद्धा निधी काढण्यात येतो व नाल्यावर येण्याजाण्यासाठी कागदोपत्री असलेली मोरी मात्र येथे चोरी गेल्याची तक्रार येथील नागरिकांची होत आहे. त्याच प्रमाणे अंगणवाडी दुरुस्ती साठी काढलेल्या २९०००रुपये निधीतून फक्त एक दरवाजा बसविण्यात येत असून दलित वस्तीमध्ये पाच ते सहा वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधण्यात आली.पण त्या टाकी मध्ये आज पर्यंत एक थेंब देखील टाकण्यात आला नाही. न वापरलेल्या पाण्याच्या टाकी साठी पुन्हा दुरुस्ती  करण्यासाठी निधी काढण्यात आला.परंतु दुरुस्ती तर नाहीच परंतु पाण्याची टाकी आहे किंवा नाही हे देखील आजपर्यंत मागील सरपंच ,ग्रामसेवक यांच्या कडून पाहण्यात आले नाही. तसेच मागील सरपंचानी गावठांच्या जागा कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर भूगोटे उतरवून घेतले आहे..अश्या प्रतिक्रिया जनार्धन कुमावत यांनी दिल्या. अशाप्रकारे चाललेला ग्रामपंचायतचा भोंगळ व मनमानी कारभाराच्या तक्रारी पत्रकारांना समोर दिलेल्या आहेत.  तत्कालीन माजी सरपंच पती यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता आमची तक्रार कोठे ही करा अश्या प्रतिक्रिया दिल्या असून हिवरखेडा त.वा.येथील ग्रामपंचायतच्या तक्रारी विषयी विस्तार अधिकारी पालवे यांच्याशी विचारणा केली असता हा विषय माझ्याकडे नाही तो बांधकाम विभागाला जावून विचारा माझा काही संबंध नाही.असे उडवाउडवीची ची उत्तर मिळत असल्याने पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी कोणत्या कामासाठी असतो असा प्रश्न ग्रामस्थांना येथे पडलेला आहे.  प्रशासनाकडून अश्या मनमानी करणाऱ्या प्रतिनिधी,प्रसाकीय अधिकारी यांची चौकशी करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे         जामनेर तालुक्यातील हिवरखेडा त.वा.येथे ग्रामपंचायतमध्ये अपहार झाल्याची घटना उघड झाल्याने सम्पूर्ण परिसरात प्रशासना विषयी केराच्या टोपलीने स्वागत केले जात आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.