Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जळगाव : केसीई संचलित इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च आयोजित आणि जळगाव आरटीओ ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयएमआर मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी डेप्युटी आरटीओ श्याम लोही ह्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक ह्या विषयावर मार्गदर्शन केले. तत्पूर्वी आयएमआरच्या वतीने हेल्मेटचे महत्व पटविणारे २० पोस्टर आणि बेनरचे अनावरण करण्यात आले, जे शहरातील विविध कॉलेजमध्ये लावले जातील. कार्यक्रमा दरम्यान श्याम लोही ह्यांनी वाहतूक नियमाचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले आणि योग्य उत्तर देणाऱ्यास बक्षीस रुपात हेल्मेट भेट दिले. कार्यक्रमात बीसीए आणि बीबीएचे १८५ विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्तावना आय एम आर च्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा.पुनित शर्मा यांनी केले. कार्यक्रमात उद्योजक किरण बच्छाव देखील मंचावर उपस्थित होते.
डेप्युटी आरटीओ श्याम लोही ह्यांनी सांगितलेले प्रमुख मुद्दे
१. मागील वर्षात ५६५ जण अपघातात मरण पावले त्यापैकी ७० टक्के जणांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित ते वाचले असते.
२. घरात जितके लोकं असतील तितके हेल्मेट असायलाच हवे.
३. मुलांना गाडीसोबत हेल्मेट देणे हि जबाबदारी पालकांची आहे, टी त्यांनी पूर्ण करायलाच हवी.
४. गाडींना दोघे मिरर असणे हे अनिवार्य आहे तसेच ते अपघातातून वाचवितात.
५. लेन कटिंगमुळे सर्वाधिक अपघातात घडतात तसेच रस्त्यावर आपल्या पुढील गाडीत किमान तितके अंतर असावे की आपण गाडी ब्रेक मारून थांबवू शकू, ज्या क्रियेला किमान २ सेकंद लागतात.
६. गाडी कधीही ट्रकच्या डाव्या टायरकडे नसावी, कि ज्यामुळे ड्रायवरला आपण दिसणार नाही, ज्याला ब्लायंड स्पॉट म्हणतात. आपण पुढील गाडीला मिरर मध्ये दिसावे हितक्या अंतरावर आपली गाडी असावी.
७. सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार जर अपघातातील जखमींना कोणी मदत केली आणि त्याचे जीव वाचले तर त्याला रुपये ५०० रक्कम आणि सन्मानपत्र आरटीओ मार्फत दिले जाते. ज्याला ‘जीवन दूत’ योजना म्हटले जाते.
८. अपघातातील जखमींना पाणी पाजू नये, त्यांची मान आगोदर सांभाळावी आणि १०८ हा क्रमांकवर फोन करून इम्ब्युलेंसची मदत मागवावी.
९. ट्रिपल सीट बसल्यामुळे गाडीचे ब्रेकिंग प्रभावित होतात आणि ज्यामुळे गाडीला थांबायला वेळ लागतो.
१०. ड्रिंक करून गाडी चालविणे हे जीवघेणे ठरते, त्यामुळे ते कधीही करू नये.