आदित्य दाडकर सीए परिक्षा उत्तीर्ण
जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलचे जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर यांचे चिरंजीव आदित्य याने सीए परिक्षा उत्तीर्ण केली. दि इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकौऊंट ऑफ इंडिया मार्फेत नोव्हेंबर २०२३ मध्ये सीए ची अंतिम परिक्षा घेण्यात आली होती. त्याच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्यासह सहकाऱ्यांनी कौतूक केले आहे. अथक परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले.