DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस, विरोधी पक्षनेत्याची निवड होणार?

मुंबई: हिवाळी अधिवेशन आजपासून 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे. फडणवीस सरकारकडून हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडले जाण्याची शक्यता आहे. संख्याबळाअभावी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळविणं कठीण आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठणार आहे.

 

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय असेल कामकाज?

 

  1. विधानसभेच्या अधिवेशनात उर्वरित आर्थिक वर्षासाठी (मार्चपर्यंत) आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त खर्चावर, सत्ताधारी- विरोधी पक्षांच्या विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी ‘पुरवणी मागणी’ यावर चर्चा होणार आहे.
  2. राज्य सरकार विधानसभेत 6 पूर्णपणे नवीन विधेयके सादर करणार आहे. तर 14 अध्यादेश विधानसभेसमोर मांडले जाणार आहेत.
  3. महायुती आघाडीतील 39 नेत्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. येत्या दोन दिवसांत मंत्र्यांना खातेवाटप केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
  4. 52 वर्षात प्रथमच विरोक्षी पक्षनेतेपद नाही- गेल्या 52 वर्षात (1972 ते 2024) प्रथमच महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड होण्यासाठी विरोधी पक्षांकडं पुरेस संख्याबळ नाही. राज्य विधिमंडळ कायद्यानुसार विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या (288) 10 टक्के म्हणजे 29 एवढं संख्याबळ हवे असते. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (एसपी) या तीनही पक्षांकडे प्रत्येकी आमदारांची संख्या 29 हून कमी आहे.

 

काय आहे विधानसभेचा नियम?: महाराष्ट्र विधानसभेचे माजी मुख्य सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा असो वा राज्य विधानसभा, विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी त्या पक्षाला 10% मिळणे आवश्यक आहे. त्याचा अर्थ 288 जागांपैकी 29 जागा मिळवणं आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार, सर्वात मोठा विरोधी पक्ष – शिवसेनेकडं (UBT) फक्त 20 सदस्य आहेत. काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (एसपी) 10 आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याची परिस्थिती यापूर्वीदेखील विरोधी पक्षांवर ओढवली आहे.

 

संख्याबळ नसताना यापूर्वी देण्यात आले होते विरोधी पक्षनेतेपद
कृष्णराव धुळप यांनी 1962 ते 1972 या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. 1962, 1967 आणि 1972 या तीन टर्ममध्ये कोणत्याही एका पक्षाकडे 10 टक्के सदस्य असण्याचा पात्रता निकष नव्हता. 1962 मध्ये काँग्रेसनं 264 पैकी 215 जागा जिंकल्या होत्या. शेतकरी आणि कामगार पक्ष 15 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. शेतकरी कामगार पक्षाकडे 10 टक्के सदस्य नसतानाही कृष्णराव धुळप यांनी 1962 आणि 1967 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.

  • 1972 मध्ये काँग्रेसने 222 जागा जिंकल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या पीडब्ल्यूपीने 7 जागा जिंकल्या होत्या. असे असले तरी 1972 मध्ये दिनकर पाटील विरोधी पक्षनेते होते.1977 मध्ये शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले.
  • 1977 मध्ये शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले.

 

विरोधी पक्षनेते कार्यकाळ पक्ष
उत्तमराव पाटील 28 मार्च 1978 17 जुलै 1978 जनता पक्ष
प्रभा राव फेब्रुवारी 1979 13 जुलै 1979 काँग्रेस
प्रतिभा पाटील 16 जुलै 1979 फेब्रुवारी 1980 काँग्रेस
शरद पवार 3 जुलै 1980 1 ऑगस्ट 1981 भारतीय काँग्रेस (समाजवादी)
बबनराव ढाकणे 17 डिसेंबर 1981 24 डिसेंबर 1092 जनता पक्ष
दिनकर पाटील 4 जुलै 1972 जुलै 1977 शेतकरी आणि कामगार पक्ष
शरद पवार 15 डिसेंबर 1983 14 डिसेंबर 1986 भारतीय काँग्रेस (समाजवादी)
निहाल अहमद 14 डिसेंबर 1986 26 नोव्हेंबर 1987 जनता पक्ष
दत्ता नारायण पाटील 27 नोव्हेंबर 1987 22 डिसेंबर 1988 शेतकरी आणि कामगार पक्ष
मृणाल गोरे 23 डिसेंबर 1988 19 ऑक्टोबर 1989 जनता पक्ष
दत्ता नारायण पाटील 20 ऑक्टोबर 1989 3 मार्च 1990 शेतकरी आणि कामगार पक्ष
मनोहर जोशी 22 मार्च 1990 12 डिसेंबर 1991 शिवसेना
गोपीनाथ मुंडे 12 डिसेंबर 1991 14 मार्च 1995 भाजपा
मधुकर पिचड 25 मार्च 1995 15 जुलै 1999 काँग्रेस
नारायण राणे 22 ऑक्टोबर 1999 12 जुलै 2005 शिवसेना
रामदास कदम 1 ऑक्टोबर 2005 3 नोव्हेंबर 2009 शिवसेना
एकनाथ खडसे 11 नोव्हेंबर 2009 8 नोव्हेंबर 2014 भाजपा
एकनाथ शिंदे 12 नोव्हेंबर 2014 5 डिसेंबर 2014 शिवसेना
राधाकृष्ण विखे पाटील 23 डिसेंबर 2014 5 जून 2019 काँग्रेस
विजय वडेट्टीवार 24 जून 2019 9 नोव्हेंबर 2019 काँग्रेस
देवेंद्र फडणवीस 1 डिसेंबर 2019 29 जून 2022 भाजपा
अजित पवार 4 जुलै 2022 2 जुलै 2023 राष्ट्रवादी
विजय वडेट्टीवार 3 ऑगस्ट 2023 26 नोव्हेंबर 2024 काँग्रेस
बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.