DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

टायर फुटल्याने बसचे नियंत्रण सुटले; भीषण अपघातात महिलेचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

जळगाव : नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी (२८ ऑक्टोबर) दुपारी झालेल्या भीषण बस अपघातात साराबाई गणेश भोई (वय ४६, रा. पाडळसा, ता. यावल) या महिला प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर बसचालकावर नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमळनेर आगाराची बस (क्रमांक एमएच-१४ बीटी-२३०६) ही जळगावकडून भुसावळच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. टोल नाक्याजवळ आल्यानंतर बसच्या समोरील चाकांपैकी एकाचा टायर अचानक फुटला. त्यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव बस थेट टोल नाक्याजवळील भिंतीवर जाऊन आदळली. धक्क्याने प्रवासी साराबाई भोई या खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्या आणि दुर्दैवाने बसच्या मागील चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी मयत महिलेचे सुपुत्र किरण गणेश भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक किशोर रामचंद्र जावळे (रा. भुसावळ) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.