DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

हाडे, सांध्यांच्या विकारांनी त्रस्त रुग्णांची महादेव हॉस्पिटल येथे गर्दी

हिवाळ्यात काळजी घेण्याची गरज ; आपत्कालीन सेवेलादेखील प्रतिसाद

जळगाव | प्रतिनिधी
शहरातील अग्रगण्य व आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलने आता हाडे आणि सांध्यांच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी विशेष ‘अस्थिरोग बाह्यरुग्ण विभाग’ सुरू केला आहे. या विभागात रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे जळगाव शहरातील नागरिकांना हाडांशी संबंधित उपचारांसाठी त्वरित आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे सोयीचे होत आहे. तसेच आपत्कालीन विभागात अपघाताच्या रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा प्राप्त झाली आहे.
महादेव हॉस्पिटलमधील या नवीन अस्थिरोग ओपीडीमुळे महत्त्वाच्या सेवा उपलब्ध झाल्या आहेत. येथे डॉ. नरेंद्र शिरसाट, डॉ. प्रमोद सारखेडवाड हे वैद्यकीय सेवा देत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी आणि योग्य उपचार रुग्णांना मिळत आहेत. फ्रॅक्चर (हाड मोडणे), सांधेदुखी, गुडघेदुखी व गादी फाटणे, खुब्याचे विकार, पायाला बाक येणे, पाठदुखी, कंबरदुखी, चालताना त्रास होणे, लिगामेंट इन्‍जुरी व खेळात होणाऱ्या दुखापती, ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे), संधिवात तसेच खेळांशी संबंधित जखमांवर सल्ला आणि उपचार डॉक्टरांकडून दिला जात आहे.
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक एक्स-रे, एमआरआय आणि आवश्यक तपासण्यांची सोय उपलब्ध झाली आहे. ओपीडीची वेळ रुग्णांच्या सोयीसाठी ही दररोज सोमवार ते शनिवारी सकाळी ९ ते ५ अशी असून आपत्कालीन सेवा २४ तास सुरु आहे. अपघाताच्या रुग्णांना मोठा दिलासा यामुळे मिळाला आहे. हाडांच्या कोणत्याही लहान-मोठ्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता या नवीन सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी (९३२५१५०००४), (९५८८४७६५९६) या क्रमांकावर संपर्क साधावा असे महादेव हॉस्पिटल प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.