DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रभाग 4 मध्ये ‘हिरकणी’ वादळ!

अपक्ष उमेदवार हिरकणी बागरे यांना युवक-महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून प्रभाग 4 ‘अ’ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून उच्चशिक्षित, अभ्यासू आणि युवा नेत्या हिरकणी जितेंद्र बागरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केल्याने प्रस्थापित पक्षांची चिंता वाढली आहे. ‘टूथब्रश’ या निवडणूक चिन्हासह त्या जनसेवेच्या मैदानात उतरल्या असून, त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दीर्घकाळ भाजपमध्ये सक्रिय असतानाही ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, या निर्णयामुळे खचून न जाता थेट जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्धार त्यांनी केला. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागातील युवक व महिलांनी त्यांना उघड पाठिंबा दिला असून, ‘हिरकणी’ हे नाव आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
हिरकणी बागरे सध्या प्रभागात घराघरांत जाऊन थेट संवाद साधत असून, केवळ मते मागण्याऐवजी नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर भर देत आहेत. त्यांच्या साधेपणा, नम्र स्वभाव आणि सुसंस्कृत वागणुकीमुळे ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत होत आहे.
फक्त आश्वासनांवर न थांबता त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मतदारांसमोर मांडला आहे. महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्र व सुरक्षा यंत्रणा बळकट करणे, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र व अद्ययावत वाचनालय, अंतर्गत रस्ते, पाणी निचरा व स्वच्छतेच्या समस्या कायमस्वरूपी सोडवणे, तसेच ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी सुसज्ज आरोग्य केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
प्रभागाला आता अभ्यासू, पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्वाची गरज आहे, अशी भावना मतदारांमध्ये प्रबळ होत आहे. हिरकणी बागरे यांचे उच्च शिक्षण आणि प्रशासकीय जाण लक्षात घेता त्या प्रभागाचा विकासाचा चेहरामोहरा बदलू शकतात, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त होत आहे. येत्या निवडणुकीत ‘टूथब्रश’ चिन्हासमोरील बटण दाबून सुशिक्षित उमेदवाराला संधी द्या, असे आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.