DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला मिळाली पॉवरफुल खाती? वाचा संपूर्ण यादी

नागपूर – महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर 8 दिवसांपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार शपथविधी पार पडला तरीही खाते वाटप जाहीर झाले नव्हते. महायुतीमध्ये महत्वांच्या खात्यांवर वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरु असल्याच्या चर्चा होत्या. विरोधकांनीही खातेवाटपावरुन सरकारवर हल्लाबोल केला होता अखेर आज खातेवाटप करण्यात आले.

फडणवीस, शिंदे, पवार यांच्यांकडील खाती

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालय स्वत:कडे ठेवले आहे. तसेच गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण आणि खातेवाटप न झालेली इतर खाती त्यांच्यकडे आहेत. एकनाथ शिंदे यांना नगरविकास खाते, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यात आले आहे. अजित पवार यांना अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क हे खाते देण्यात आले आहे.

कॅबिनेट मंत्री खातेवाटप
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री खातेवाटप
1. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
2. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
3. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
4. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
5. योगेश कदम – गृहराज्य शहर
6. पंकज भोयर – गृहनिर्माण,

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.