DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अमळनेरात ना. अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांची दिवाळी भेट पदयात्रा ठरली लक्षवेधी

अमळनेर । शहरात मंत्री तथा महायुतीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी महायुतीची दिवाळी भेट पदयात्रा काढत लहान, मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात, यावेळी सर्वानीच विजयी भव च्या शुभेच्छा व आशीर्वाद मंत्री पाटील यांना दिलेत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशीं  सकाळीच पाच पावली देवी मंदिरात सर्व भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना महायुती चे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक सर्व एकत्रित आल्यानंतर तेथून वाजत गाजत महायुती सह अनिल पाटील व स्मिता वाघ यांचा जयघोष करीत पदयात्रेस सुरूवात झाली.

यावेळी दोघांनी प्रत्येक व्यापारी बांधवांच्या दुकानात जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वच व्यापारी बांधव बाजारपेठत झालेले नवीन रस्ते यामुळे व्यापारी व ग्राहकांची झालेली सोय, शहरात सर्वत्र झालेले रस्ते व विकास कामे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शहरातील गुंडगिरी 100 टक्के थांबल्याने व्यापारी बांधवाचे झालेले संरक्षण या बाबींचा आवर्जून उल्लेख करत आम्ही अनिल पाटील यांनाच पुन्हा आमदार म्हणून पाहू इच्छितो यामुळे मतदान तर त्यांनाच करू असे सांगताना दिसत होते, शहरासाठी मंजूर झालेली दररोज पाणी देणारी 200 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना देखील शहराच्या अर्थकरणास चालना देणारी ठरेल असेही काहींनी सांगितले. याशिवाय व्यापारी बांधव महायुतीच्याच पाठीशी असल्याचे काही व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. यावेळी शिवाजी मार्केट, बाजारपेठ परिसर, भागवत रोड, मारवाडी गल्ली, स्टेशन रॉड, सुभाष चौक परिसर, कुंटे रोड, दाणा बाजार, सराफ बाजार आदी परिसरातुन ही पदयात्रा काढण्यात आली. काही व्यापारी देखील स्वयंस्फूर्तीने यात सहभागी झाले होते. एकंदरीत आपुलकीचा भाव या पद यात्रेतून व्यावसायिक व व्यापारी बांधवाना दिसून आला. दुपार पर्यंत ही पदयात्रा सुरूच होती, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा अतिशय मोठा ताफा आणि उत्साह असल्याने या पद यात्रेने संपूर्ण बाजार पेठेचे लक्ष वेधले होते. यात महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक सहभागी झाले होते.

 

थांबलेल्या गुंडगिरीचा आवर्जून झाला उल्लेख
शहरात अनेकदा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून व्यापारी बांधवाना धमकावून खंडणी मांगणे किंवा धाकाने उधार माल घेऊन जाऊन पुन्हा तोंड न दाखवणे असे प्रकार घडत होते, परंतु अनिल पाटील हे आमदार झाल्यापासून अनेक गुंड प्रवृत्तीची धरपकड होऊन ते कोंडले गेल्याने आज खऱ्या अर्थाने व्यापारी सुरक्षित झाले निर्भिड पणे व्यवसाय होत आहे.
– विजय कुमार जैन, व्यापारी अमळनेर

 

दिवाळीचे फटाके तर आम्हीच वाजविणार
आज दिवाळी निमित्त ही फेरी काढून आपल्या व्यापारी बांधवाना शुभेच्छा आम्ही दिल्या आहेत.प्रत्येक ठिकाणी आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळाले असून व्यापारी बांधवांचा हा प्रतिसाद पाहता दिवाळीचे खरे फटाके तर आमची महायुतीच उडविणार हे स्पष्ट आहे.
– अनिल भाईदास पाटील, महायुती उमेदवार

 

व्यापारी बांधव महायुतीच्याच पाठीशी
लोकसभा निवडणुकीत सर्व लहान मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधव भाजप व महायुतीच्याच पाठीशी होते, शहरातील प्रत्येक व्यापारी बांधवानी मला मतदान केले आहे. आजही आम्ही दिवाळी भेटीच्या निमित्ताने प्रत्येकाचा उत्तम प्रतिसाद अनुभवला असून यामुळे व्यापारी बांधव या निवडणुकीत देखील भाजप महायुतीच्याच पाठीशी असल्याचे स्पष्ट आहे. महायुती आणि विकास कामे या बळावर अनिल पाटलांना जोरदार समर्थन मिळेल यात शंका नाही .
– स्मिता उदय वाघ, खासदार, जळगाव लोकसभा मतदारसंघ

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.