DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

तलाठ्यासह २ पंटर जाळ्यात

मुक्ताईनगर ;- सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागून स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा तलाठ्यासह दोन खाजगी पंटरांना जळगाव एसीबीकडून अटक करण्यात आली. बुधवार, 8 रोजी दुपारी झालेल्या  यामुळे जिल्ह्यातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. आहेत.

काकोडा तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे (42, रा.चिखली रानखांब, ता.मलकापूर, ह.मु.गणपती नगर, भाग, 5 मलकापूर) तसेच खाजगी पंटर अरुण शालीग्राम भोलानकार (32, कुर्‍हा, ता.मुक्ताईनगर)व संतोष प्रकाश उबरकर (25 कुर्‍हा, ता.मुक्ताईनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

जळगावातील 30 वर्षीय तक्रारदार यांचे आजोबा यांचे नावे कुर्‍हा, ता. मुक्ताईनगर येथे शेत गट क्र.167/18 आहे. तक्रारदार यांचे आजोबा 1997 मध्ये मयत झाले असून तेव्हापासून तक्रारदार यांचे वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे यांचे 7/12 उतार्‍यावर नाव लावणे बाकी होते. त्यासाठी तक्रारदार यांनी 1 जानेवारी रोजी कुर्‍हा तलाठी यांची भेट घेतली असता त्यांनी प्रत्येक वर्षाचे 220 रुपये या प्रमाणे 6000 रुपये शासकीय फी भरावी लागेल, असे सांगितले व शासकीय फी भरायची नसेल तर मला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली.

जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, दिनेशसिंग पाटील, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.