DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भाजपा विद्यमान आमदारांना देणार नारळ ?

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली ; केतकी पाटील, अश्विन सोनवणे, रोहित निकम यांच्या नावावर खल

  • भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली…
  • अश्विन सोनवणे, रोहित निकम, केतकी पाटील यांच्या नावावर खल…

जळगाव : विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी उमेदवार बदलाची चाचपणी करीत असून विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वाढली आहे. माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, मार्केटींग फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम व गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांची नावे चर्चेत आली असून पक्षश्रेष्ठी या नावांवर विचार करीत आहे.

लोकसभा निवडणूका संपल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यात आलेल्या अपयशावर मंथन देखील सुरु केले असून बैठकांचा धडाका लावला आहे. बहुतांश ठिकाणी विद्यमान आमदारांबाबत नाराजीचा सूर असून पक्षाला हानी पोहचण्याची शक्यता आहे. जळगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांच्याबद्दलही नाराजी वाढली आहे.

 

सलग दोन टर्म आमदार असतांनाही शहरात एकही मोठा प्रकल्प उभारण्यात राजूमामांना यश आलेले नाही. सर्वसामान्यांसाठी कुठलेही ठोस काम केले नसल्याने त्यांचे प्रगती पुस्तक कोरे आहे. केवळ लग्नकार्य, द्वारदर्शन यातच राजूमामा व्यस्त दिसून येत आहेत. मतदारसंघात भाजपाचा आमदार असतांना महानगरपालिकेतील सत्ता हातून गेली. पत्नीला महापौर केल्यामुळे गत काळात राजूमामांबद्दल असलेली सहानभूती ओरसत गेली. या सर्व बाबींवर पक्षाकडून खल सुरु असून विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्याची मानसिकता देखील झाल आहे.

हे आहेत इच्छुक
केंद्रात भाजपाचे सरकार आल्याने विधानसभेला भाजपाला ‘अच्छे दिन’ येतील या दृष्टीकोनातून हालचाली सुरु झाल्या आहेत. शहरातील भाजपमधील दुसरा गट उमेदवारी परदात पाडण्यासाठी अधिकच सक्रिय झाला आहे. राजूमामांबद्दल असलेली नाराजी पक्षाला हानी पोहचवू शकते हा संदेश हा गट वरिष्ठ पातळीवर पोहचवत आहे. माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, मार्केटींग फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, डॉ. केतकी पाटील यांची नावे सध्या चर्चेत आहेत. तेही विधानसभेसाठी इच्छुक असून वरिष्ठ पातळीवर फिल्डींग लावून आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.