DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

निवडणुकीपूर्वीच आमदार सुरेश भोळे पडले ; उत्साही कार्यकर्ता खांद्यावर उचलायला गेला, पण तोल गेला अन् आमदार पडले

जळगाव । विघ्नहर्ता गणरायाला मंगळवारी सर्वत्र उत्साहात निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींनी ठेका धरत गणेशभक्तांचा उत्साह वाढवला. मात्र, जळगाव शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. एका उत्साही कार्यकर्त्यामुळे जळगावचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे खांद्यावरुन पडले असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. परंतु सुदैवाने भोळे यांनी काही दुखापत झाली नाही.
जळगाव शहरात मंगळवारी गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे मिरवणुकीत सहभागी झाली होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यर्त्यांसोबत ठेका धरला. कार्यकर्त्यांबरोबर ते नाचू लागले. मग एका उत्साही कार्यकर्त्यांने आमदार राजूमामा भोळे यांना मागून येऊन खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या कार्यकर्त्याला त्यांचा तोल सांभाळता आला नाही. यामुळे आमदार राजूमामा भोळे त्याच्या खांद्यावरुन थेट पुढच्या दिशेने खाली पडले. त्यावेळी गिरीश महाजन आणि इतर कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि त्यांना उचलले. परंतु सुदैवाने आमदार भोळे यांना दुखापत झाली नाही. भोळे यांच्या चेहऱ्यावरुन ते चांगलेच संतापलेले दिसत होते.

कार्यकर्त्याचा उत्साह मामांना नडला
विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरु असतांना टॉवर चौकात मंत्री गिरीश महाजन यांनी ठेका धरत गणेश भक्तांचा उत्साह वाढविला. आमदार राजूमामा भोळेही मंत्री महाजनांसमवेत ठेका धरत होते. एक कार्यकर्ता राजूमामा भोळेंच्या पाठीमागून येत त्यांना खांद्यावर घेत असतांनाच त्याचा तोल गेल्याने आमदार भोळे मंत्री महाजनांसमोर कोसळले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते चांगलेच संतापले होते. उत्साही कार्यकर्त्यावर राजूमामा देखील चांगलेच भडकले होते.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.