DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

ता.१५ ते २१ जूनच्या दरम्यान योग सप्ताहाचे आयोजन ; विध्यार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग

जळगाव | प्रतिनिधी 

येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात बुधवार ता. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात योग सप्ताहाचे उत्साहात समारोप करण्यात आला. ता. १५ ते २१ जून दरम्यान महाविद्यालयात योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचारी व विध्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच नवचैतन्य निर्माण झाल्याने,महाविद्यालयाचा परिसर योगमय झाला होता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या की, “योगा म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मीक विकासाची गुरुकिल्ली आहे, सर्वांनी नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणीत फायदे शोधले पाहीजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळवल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे सांगतानाच, योगसाधणेचे महत्व व विविध योगासनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यानंतर आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक निशिता रंगलानी व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रतिनिधी यांनी योग सप्ताहात उपस्थितांना योगविषयी माहिती दिली. व्यासपीठावर रायसोनी महाविद्यालयाच्या प्रा. सुवर्णा आवटे यांनी योग प्रात्यक्षिके करुन दाखविली व त्यानुसार उपस्थितांनी योगाभ्यासातील सर्व आसनांची प्रशिक्षक निशिता रंगलानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके केली. या कार्यक्रमाला रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. सोनल तिवारी, रायसोनी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. वासिम पटेल, प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. श्रेया कोगटा हे होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.