DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न

जिल्हा पोलीस जलतरण संघाची बाजी ; संचालिका सौ. राजुल रायसोनी यांच्या हस्ते बक्षीस वितरण

जळगाव  : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रीक्टच्या सयुंक्त विद्यमाने ता. २३ रविवार रोजी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मिनी ऑलम्पिक जलतरण तलाव येथे जिल्हास्तरीय एक्वाटिक चॅम्पियनशिप – २०२३ या लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सांघिक गटात जळगाव जिल्हा पोलीस जलतरण तलाव संघाने बाजी मारुन विजेतेपद पटकावले तर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने उपविजेतेपद तसेच तृतीयस्थानी अ‍ॅक्वा स्पा हा संघ विजयी ठरला. जळगाव जिल्हा विभागातून या स्पर्धेत ११० जलतरणपटू सहभागी झाले होते.

जळगाव शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित जिल्हास्तरीय एक्वाटिक चॅम्पियनशिप – २०२३ ही जलतरण स्पर्धा दोन सत्रांमध्ये खेळविण्यात आली. फ्रि स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटर फ्लाय ब्रेस्ट्रोक, वैयक्तिक मिडले, सांघिक मिडले अशा सहा प्रकारांत झालेल्या या स्पर्धेत ६ ते १७ वर्षांखालील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी समारोप कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रीक्टच्या अध्यक्षा रेवती नगरकर, उपाध्यक्ष राजेंद्र ओक, सहसचिव कमलेश नगरकर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी क्रिडा प्रकारातील एक अतिशय महत्वाचा क्रिडाप्रकार म्हणजे जलतरण होय. या क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल तर्फे या भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध नामांकित जलतरणपटू घडविण्यात आमच्या स्कूलचे मोलाचे योगदान ठरावे यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. सदर स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून कामगिरी बजावलेले कमलेश नगरकर, राजेंद्र ओक, ईदउल्ला खाटिक, राजेश नेवे, मुनोद झोपे, सुरज दायमा यांनी जबाबदारी सांभाळली तर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे क्रीडा संचालक संजय चव्हाण यांनी सहकार्य केले.

 

निकाल असा –

• मोठा गट मुले –

• लव हसवाणी, खुश हसवाणी, रुद्र मतानी,

• मोठा गट मुली –

• अशिता रायसोनी, मन्मयी थथे, ऋतुजा भंडारी

• छोटा गट मुले –

• रोनक भल्ला, लोकिक ढगे, अर्णव खटवाणी, मनीत पंजाबी

• छोटा गट मुली –

• स्वरा वाघ, स्वरा कासट, सिया बलदवा

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.