गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून २० जणांचा मृत्यू
दिव्यसारथी ऑनलाईन : गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून किमान २० जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नैसर्गित आपत्तीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.
‘गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानं मला खूप दु:ख झालं आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजन गमावले आहे त्यांच्या अपरिमित हानीबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहेत, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत’, असं अमित शहा यांनी X वर गुजरातीमध्ये लिहिले.
हिंदुस्थानच्या हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र जिल्ह्यांतील काही भागांमध्ये केंद्रित असताना आज पाऊस कमी होण्याची अपेक्षा आहे.