मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला !
जळगांव – जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी दि.६ नोव्हेंबर रोजी शाहू नगरातील जागृत देवस्थान तपस्वी हनुमान मंदीर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आला. यानंतर शाहू नगरातील परिसरातील विविध भागांमध्ये जाऊन डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचार सुरुवात झाली. रॅलीमध्ये जनतेमधून भरभरून प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी औक्षण करून तसेच पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
महिला भगिनींकडून औक्षण : जेष्ठाकडून घेतले शुभाशीर्वाद
डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला सामान्य मतदार वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.ठिकठिकाणी घरोघरी त्यांचे स्वागत केले जात होते.डॉ. अनुज पाटील यांच्या स्वागताला ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले, अनेक बहिणींच्या ओवाळणीतून कौटुंबिक प्रेम दिसलं. सोबत असलेल्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याने लोकांच्या मनात नव्या जोमाची आणि परिवर्तनाच्या आशेची ज्योत प्रज्वलित केली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, सौ.लीना पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे, महानगरअध्यक्ष किरण तळले, उपमहा नगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहितचे राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगळे, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, साजन पाटील जितेंद्र पाटील, ललित शर्मा, आशुतोष जाधव, यांच्यासह डॉ.अनुज पाटील यांच्या परिवारातील सदस्य महेंद्र पाटील, यशस्वी पाटील, रेखा पाटील, डॉ.जानकीराम पाटील, प्रकाश पाटील, डॉ.लीना पाटील, डॉ, के डी पाटील, डॉ.अभिजीत पाटील, डॉ.अजय सोनवणे, कुणाल पाटील, सिद्धार्थ पाटील, डॉ.मौसमी पाटील, हितेश पाटील, शरीफ खान, राहुल पाटील, सागर पाटील, प्रवेझ शाह, अर्जुन साळुंखे पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आदीची उपस्थिती होती.
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वचनबद्ध : डॉ.अनुज पाटील
जनतेचे हे प्रेम फक्त विश्वास नसून, तो एक संकल्प आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच जळगावच्या उज्ज्वल भविष्या साठी. प्रत्येकाने आपल्या घरातील व मनातील प्रश्न मांडले आणि डॉ. पाटील यांनी त्या समस्या आपल्याच घरातील मानून त्यावर तोडगा काढण्याचं वचन दिले.