श्री. क्षेत्र वालझिरी तीर्थस्थानाच्या विकासासाठी 1 कोटींचा निधी
चाळीसगाव – रामायणकार महर्षी वाल्मीक ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेले तीर्थक्षेत्र वालझिरी परिसरात नव्हे तर देशात सुपरिचित आहे. या तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात या भाविकांना अधिकाधिक सुख सुविधा मिळाव्यात यासाठी माननीय पर्यटनमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून पर्यटन निधीतून एक कोटी रुपये विकासासाठी उपलब्ध करून दिले आहे. भाविकांच्या विविध सोयीसुविधासह या परिसराचा कायापालट होणार असून या ऋषीभूमीची पर्यटन भूमीकडे वाटचाल अशीच सुरु राहवी यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज श्री क्षेत्र वालझिरी येथे 1 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामाचा भूमिपूजन सोहळा खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.त्यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.
मार्केट कमिटी माजी सभापती मच्छिंद्र राठोड, पं.स. माजी सदस्य बाळासाहेब राऊत, उपसभापती सुनील पाटील, ओबीसी प्रदेश सचिव रमेश सोनवणेसर,जिल्हा भाजप सचिव ऍड.प्रशांत पालवे,संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, रा.वी.संचालक प्रमोद बापू पाटील,उपविभागीय अभियंता सुपले साहेब, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, माजी पंस सदस्य सुरेश गजे, संजय चौधरी, चेअरमन संतोष देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, माजी सरपंच संतोष देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरूवातीला खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते येथील महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख व संचालकांच्या हस्ते खासदार उन्मेशदादा पाटील यांचा तुकाराम गाथा व तुळशी माळ देवून सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सचिव सतीश देशमुख सर यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले की गेल्या महिन्याभरापूर्वी खासदार उन्मेशदादा पाटील यांची भेट घेऊन परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता आहे. याबाबत आपण प्रयत्न करावे अशी विनंती केली होती. यावेळी तात्काळ निधी उपलब्ध करून देतो असा शब्द दिला होता. आज त्यांनी दिलेला शब्द खरा करुन संस्थेला 1 कोटी निधी उपलब्ध करून दिला याबद्दल संस्था ऋणी राहील.
माजी सभापती मच्छिंद्र राठोड, आदर्श शेतकरी बाळासाहेब राऊत, मुख्याध्यापक रमेश सोनवणे सर यांनी खासदार उन्मेशदादांच्या तालुक्यातील आध्यात्मिक तीर्थक्षेत्रासाठी सुरू असलेल्या धडाडीचे कौतुक केले. अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व तीर्थक्षेत्राचा विकास होत असताना हे क्षेत्र राहून गेल्याचे खंत माझ्यासह खासदारांना देखील होती.मात्र गेल्या महिन्यात झालेल्या भेटीत त्यांनी निधी उपलब्ध करून देण्याचा दिलेला शब्द आज पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. एक तरुण तडफदार युवा उच्च शिक्षित,विनम्र खासदार लाभल्याने जनतेसह आम्हा भाविकांना देखील आनंद असल्याचे ते म्हणाले.
पिंपरखेड सरपंच शेख दिलफरोज, सांगवी सरपंच संतोष राठोड, पिंपरखेड तांडा सरपंच अरविंद चव्हाण,योगेश चव्हाण, इरफान शेख, उमेश आव्हाड, वाडीलाल चव्हाण, सुदाम चव्हाण,मंगतू चव्हाण, संतोष मोरे, संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत देशमुख, खजिनदार रघुनाथ जगताप, विजय भोसले,शंकरराव पवार, अशोक भोसले, इंजि. प्रशांत देशमुख, एड.रणजीत पाटील, विजय ठुबे, जयवंतराव देशमुख, दीपक गुरव,रवीआबा राजपूत, सौरव पाटील, कल्पेश मालपुरे, अमित सुराणा, कल्पेश महाले, मयूर साळुंखे, सुनील रणदिवे,सर्वेश पिंगळे, मुकेश गोसावी, चेतन वाघ स्वप्नील मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मुकेश पवार तर आभार रवींद्र राजपूत सर यांनी मांडले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वारकरी बांधवांची उपस्थिती होती.