.. अन् शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदावरच बसवलं ; गिरीश महाजन
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिंदे गटाच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. यावेळी महाजन यांनी एकनाथ शिंदे यांचा जानता राजा म्हणून गौरव केला. यावेळी सत्तांतर नाट्य कसे घडले याची माहितीच महाजन यांनी दिली.
समुद्रात अशी लाट येते आणि ती बाहेर नेऊन टाकते. अशी तशी लाट आली नाही, त्या लाटेनं शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदावरच बसवलं. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून सारखं काम सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे अजिबात झोपत नाही. रात्री सुद्धा ते लोकांच्या भेटी घेत असतात. आधीचे मुख्यमंत्री हे घरी बसून काम करतो, मंत्रालयाची पायरी सुद्धा चढले नाही. आमचा मुख्यमंत्री पाहा, खरा आमचा जानता राजा आहे, खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहे. सगळे प्रलंबित काम करत आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
‘एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले? या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. हे खरं आहे. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथराव पुढे निघाले, ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलं सारं.. जुळून आलं. घडून आल्या यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होता, असं गिरीश महाजन म्हणाले.
‘हे काही सोपं नव्हतं, सर्व मिशन एवढं सोपं नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून ४० जण बाहेर पडतात. उद्धव ठाकरे यांना कंटाळून ते बाहेर पडतात. हे मुळीच सोपं नव्हतं. 17-18 लोक घेऊन बाहेर पडायचं आणि पन्नासपर्यंत मजल गाठायची हे खूप अवघड होतं. मध्येच मिशन फेल झालं तर काय करायचं असं वाटायचं, मात्र पुढारी कसे असतात तुम्हाला माहिती आहे, असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकली.