मुंबई : देशातील ऐतिहासिक प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात विविध उपक्रम सुरू झाले आहेत. त्याचबरोबर अयोध्येतील राम मंदिराचा ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकार सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, छत्तीसगड, गोवा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक भाजप शासित राज्यांनी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गुरुवारी, केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालयांमध्ये अर्धा दिवस काम करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे, वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने सांगितले की, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि प्रादेशिक ग्रामीण बँका 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंतच सुरु राहतील.