लंका विजय व रावण दहनाने झाला ५ दिवसीय श्रीराम कथेचा समारोप
श्रीराम जय राम जय जय रामच्या जयघोषाने भाविक मंत्र मुग्द
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव येथील जी. एस. ग्राऊंड शिवतीर्थ मैदान येथे ५ दिवसापासून शिवमहापुराण समिती, आ. राजूमामा मित्र परिवार यांच्या वतीने ह.भ.प. परमपूज्य दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून ५ दिवशी लंका विजय व रावण दहनाने झाला श्रीराम कथेचा समारोप सायंकाळी ५.३० वा झाला. या प्रसंगी राम जन्मभूमी सोहळ्या निमित्त आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने प्रभू श्रीरामाच्या चित्ररंगभरा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेमध्ये ४ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील २५० विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या चित्र रंगवल्याबद्दल आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आली. आजच्या कथे प्रसंगी विशेष अतिथी म्हणून अयोध्या राम मंदिर येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जळगाव शहराच्या वतीने उपस्थित राहिल्याबद्दल जैन उद्योग समूहाचे उद्योजक अशोकभाऊ जैन यांना अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती देऊन ह.भ.प. दादा महाराज जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आरतीचा मान अशोकभाऊ जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजू न्याती, विजय गर्गे, अविनाश नेहते, भायजी मुंदडा, मा. आ. चंदूभाई पटेल, भा.ज.प जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळ्केकर महाराज, भाजप सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, उद्योजक नंदुशेठ अडवानी, देशोन्नती संपादक मनोज बारी, कथाकार साईगोपालजी देशमुख, मा. नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, रंजनाताई वानखेडे, भगत बालानी, चंद्रकांत (आबा) कापसे, प्रशांत नाईक, दीपक बाविस्कर, गौरव पाटील, रवींद्रसिंग पाटील, मिलिंद कोल्हे, अविनाश बोरोले, राजेंद्र कोल्हे, पांडुरंग इंगळे, आ. सुरेश भोळे (राजूमामा) मा. महापौर सीमाताई भोळे, विशाल भोळे, डॉ. जुही भोळे, मोहित भोळे इत्यादी मान्यवरांनी महाआरती केली. गेल्या २० तारखेपासून ते २४ तारखेपर्यंत हजारो नागरिकांनी या कथेचा लाभ घेतला. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक समितीच्या वतीने सर्वांचे आभार आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी केले. कथेच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.