DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

खेळांद्वारे धार्मिक संदेश; यशस्वी जीवनासाठी ‘द सेव्हन मंत्राज ऑफ सक्सेस’ चे सादरीकरण

जळगाव : तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास सुरवात झाली. १० एप्रिल रोजी जन्मकल्याणक असून त्या महोत्सव पर्वाचा आज पहिला दिवस होता. सुश्रावक आणी सुश्राविकांसह श्रद्धाळुंमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. आज सकाळी सामुदायिक सामायिक या साप्ताहिक गतिविधीमध्ये ‘ए कन्फर्म टिकट टू मोक्ष’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम नमन-निपूण डागा यांनी सादर केला. धार्मिक शिकवणीचा दैनंदिन जीवनात उपयोग करत आपण मोक्षाकडे कशी वाटचाल करू शकतो याचे सुंदर हृदयस्पर्शी विवेचन केले. या वेळी नेहमीच्या सामायिक सदस्यां व्यतिरिक्त अनेक श्रद्धाळु मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाची आयोजन व्यवस्था भाऊ मंडळ, सुशिल बहु मंडळ व श्री जैन रत्न हितैषी श्राविका मंडळ यांनी केली होती. तीर्थंकर प्रभू श्री महावीर जन्मकल्याणक समितीचे अध्यक्ष राजकुमार सेठिया आणि कोअर कमिटी सदस्य यावेळी उपस्थित होते.

बालगोपालांसाठी ‘गेम झोन व कार्निवल’
‘गेम झोन व कार्निवल’ हा खेळांद्वारे धार्मिक संदेश देणारा आगळा वेगळा कार्यक्रम सकाळी ११ वाजेला पार पडला. यात बालगोपांसह श्रद्धाळुंनी सहभाग घेतला. जे. पी. पी. महिला फाऊंडेशनद्वारा आयोजन व्यवस्था केली होती. याचे उद्घाटन रजनीकांत कोठारी, मनिष जैन, भारती रायसोनी, शंकरलाल कांकरिया, प्रदिप मुथा, ललित लोडाया, स्वरूप लुंकड, नयन शहा, महेंद्र जैन, दिपा राका आदी मान्यवर उपस्थित होते. खेळाडूत धर्मसाधनेचे बाळकडू घेत विविध खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवरसुद्धा महिलांसह बालगोपालांनी गर्दी केली होती.

‘द सेव्हन मंत्राज ऑफ सक्सेस’
स्वाध्याय भवन येथे संध्याकाळी ‘द सेव्ह मंत्राज ऑफ सक्सेस’ हा सेमिनार नमन-निपूण डागा बंधूनी सादर केला. यात धार्मिक आधार घेत जीवनात यशस्वी होण्यासाठी सात गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत हे समजावून सांगण्यात आले. दैनंदिन जीवनात मार्गक्रमण करताना अहिंसा, सत्य, संयम, चिकाटी याचा आधार घेत संतूलन साधत यशस्वी होता येते हे त्यांनी सादरीकरणातून स्पष्ट केले. या विषयाला विस्तार देत उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे संयोजन श्री. जैन रत्न युवक परिषदेने केले होते. जिज्ञासू मंडळींसह युवा वर्गाने यात विशेष उपस्थिती नोंदवली.

यासह सम्यक महिला मंडळाने अणुव्रत भवन येथे पारिवारीक सामुहिक भजन गायन प्रतियोगिता आयोजित केली होती. त्यावेळी उज्ज्वला टाटिया, राजेश जैन, पारस टाटिया, हिरालाल बुरड, पवन सामसुखा आदि मान्यवर उपस्थित होते. लॉकडाऊन कपल गृपने लहान मुलांसाठी धार्मिक टॅटू स्पर्धा आयोजित केली त्यात लक्षणीय बालकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रदीप रायसोनी, अमर जैन, प्रविण पगारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

तेरापंथ ज्ञानशाळेने भक्तांबर स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी नम्रता सेठिया, चंद्रकांता मुथा, ललिता श्रीश्रीमाळ, सुनील बैद, जितेंद्र चोरडिया, रिंतू छाजेड आदी उपस्थित होते. समरथ महिला मंडळाने चौदा नियम प्रश्नावली प्रतियोगिता, डिंगबर जैन श्राविका मंडळाने मेहंदी स्पर्धेचे आयोजन केले होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी सुनील बाफना, जिनेंद्र दोशी, स्नेहल कोठारी, आकाश चोपडा, विशाल चोरडिया, किशोर भंडारी, तेजेस कावडिया, रूपेश लुंकड, ममता कांकरिया, सारिका कटारिया, अपूर्वा राका, ज्योती लुंकड, गणेश कर्नावट, उदय कर्नावट, महावीर बोथरा, पुजा बोरा, मनिषा लोढा, प्रेक्षा पिचा, रूची सेठिया, वंदना जैन, रिता पटनी, सुशील दोशी, अभिषेक बाफना, मनोज लोढा, संजय कांकरिया आदींसह जन्मकल्याणक समितीचे कोअर कमिटी व कार्य समिती च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.