संतापजनक! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत बापानेच केलं घाणेरडे कृत्य ; बाप-लेकीच्या नात्याला काळीमा
धरणगाव : तालुक्यातील एका गावात बापानेच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून याप्रकरणी बुधवारी धरणगाव पोलीस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की , अल्पवयीन मुलगी तिची आई व वडिलांसोबत वास्तव्यास आहे. मुलीचे तिच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी तिच्या मनाविरुद्ध एका तरुणासोबत विवाह करून दिला. लग्नानंतर मुलीला तिचा पती हा दारू पिऊन भांडण तसेच मारहाण करत असल्याने त्रासाला कंटाळून सात ते आठ महिन्यानंतर अल्पवयीन मुलगी ही दुसऱ्या राज्यात पळून गेली होती. पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला परत आणले होते. व बालकल्याण समिती जळगाव येथे दाखल केले होते. याठिकाणी एक ते दोन महिने राहिल्यानंतर मुलगी पुन्हा तिच्या आई वडिलांसोबत राहण्यास गावी गेली. यादरम्यान दोन तीन महिने उलटल्यानंतर मुलीवर तिच्या बापानेच जोर जबरदस्तीने मारहाण करत अत्याचार करायला सुरुवात केली. पाच ते सहा महिन्यापर्यंत अश्लील व्हिडिओ दाखवून बापाने मुलीवर अत्याचार केले, याला विरोध केल्यानंतर बाप मुलीला मारहाण करत असे. या घाणेरड्या प्रकाराला कंटाळून मुलीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर बुधवारी बापा विरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहे.