DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शिंदे गटही देणार ‘डमी’ उम्मेदवार

भाजपच्या अपक्ष उमेदवाराच्या खेळीला जशास तसे

जळगाव : भारतीय जनता पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीत युती असूनही शिवसेना उमेदवारांच्या विरोधात डमी अपक्ष उमेदवार उभे केले होते. त्यामुळे अनेक ठकाणी शवसेना उमेदवारांना धोका निर्माण झाला होता. यावेळीही भाजप तोच डाव खेळण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शिवसेना शिंदे गटही सावध झाला आहे. तेही भाजपच्या मतदारसंघात डमी उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होती. मात्र तरीही जळगाव ग्रामीण, चोपडा, एरंडोल, पाचोरा या शवसेनेच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने अपक्ष डमी उमेदवार उभे केल्याचा आरोप शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे केला होता. त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, पाचोरा मतदारसंघात अमोल शिंदे, जळगाव ग्रामीण मतदारसंघात चंद्रशेखर अत्तरदे, चोपडा मतदारसंघात प्रभाकर सोनवणे व एरंडोल मतदारसंघात गोविदराव शरोळे हे अपक्ष उमेदवार आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांना आपले डमी उमेदवार म्हणून उभे केले आहेत. त्यावर मोठा वादंगही झाला होता. निवडणुकीत या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मतदान घेतले.शिवसेनेच्या उमेदवारांची दमछाकही झाली. मात्र विजयी उमेदवार शिवसेनेचेच झाले.

डमी उमेदवाराकडे असेल लक्ष
भाजपा व शिवसेना शिंदे गट मित्र पक्ष असूनही एकमेकाविरुद्ध डमी उमेदवार देण्याची खेळी करत असल्याने राजकीय वर्तळात याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेत मोठ्याप्रमाणावर अपक्ष उमेदवार उभे राहण्याची शक्यता असल्याने यात भाजप व शिंदे गटाचे डमी उमेदवार कोण असेल याकडे मतदारांचे लक्ष असेल. मात्र वरिष्ठ नेते या वादाकडे लक्ष देवून समोपचार घडवतील का? हेच पाहणे महत्वाचे ठरेल.

भाजप पुन्हा खेळी करणार
भारतीय जनता पक्ष या निवडणुकीतही आपल्या मत्र पक्षाच्या उमेदवारांविरोधात जुनी खेळी खेळण्याची शक्यता आहे. शिवसेनाशंदे गटाच्या या मतदारसंघात अपक्ष उमेदवार तयारीस लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला भाजप पाठबळ देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटही अपक्ष देणार
भारतीय जनता पक्षासोबत यावेळी शवसेना शिवसेना शिंदे गटाची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात भाजपला जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, जामनेर हे मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. भाजपने जर जुन्या खेळीनुसार शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे केले तर शिवसेना शिंदे गटही भाजपच्या या उमेदवारांच्या विरोधात अपक्ष उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात
येत आहे

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.