जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “थेरी ऑफ कम्प्यूटेशनस” या विषयावर कार्यशाळा
विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती ; प्रशिक्षित तज्ञ डॉ. रिशी रंजन सिंह यांचे सखोल मार्गदर्शन
जळगाव : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणक विज्ञान अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून अभियांत्रिकेतील “थेरी ऑफ कम्प्यूटेशनस” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. आयआयटी भिलाई येथील संगणक विभागातील प्राध्यापक डॉ. रिशी रंजन सिंह हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते त्याच्याच हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील तसेच आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रमोद गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी संगणक विज्ञान अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागाची शैक्षणिक व विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच थेरी ऑफ कम्प्यूटेशनसबद्दलही विध्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. रिशी रंजन सिंह यांनी कम्प्यूटेशनसची थेरी म्हणजे काय, अल्गोरिदम, सेट थेअरीच्या कम्प्यूटेशनल संकल्