रावेरनजीक बर्निंग बसचा थरार, ३० प्रवासी सुखरूप
रावेर : रावेर ते पुणे मोठ्या संख्येने खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांची वाहतूक करत असतात आज शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी रावेर कडून पुण्याकडे निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्स (Sai Siddhi Travels) प्रवाशांना घेऊन जात असताना तीने वडगाव-वाघोदा दरम्यान अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. लागलीच ३० प्रवाशांना खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर येथून पुणे येथे दररोज खाजगी ट्रॅव्हल्स बसेस रोज धावत असतात. शनिवारी १७ नोव्हेंबर रोजी साई सिद्धी कंपनीची ट्रॅव्हल्स रावेरातून निघाली असताना निंभोरा फाट्याजवळ अचानक बसने पेट घेतला. चालकाने तातडीने बस बाजूला घेत सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. काही क्षणातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली. आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. सावदा व रावेर येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. निंभोरा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच तेथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनेची पोलीस माहिती घेत आहेत. ट्रॅव्हलच्या अशा घटनांमध्ये मोठी वाढ होत चालली आहे. परंतु आरटीओ विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. बऱ्याच जुन्या गाड्यांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केला जात असल्याने अशा घटना घडत असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात आहे.