DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

१ एप्रिलपासून ‘UPI पेमेंट’ महागणार !

मुंबई : ऑनलाईन व्यवहारांसाठी UPI वापरत असाल तर ही तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून UPI ​​व्यवहार महाग होणार आहेत. तुम्ही २,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे भरल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया परिपत्रकानुसार २,००० रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर १.१ टक्के शुल्क भरावे लागेल. हे शुल्क वापरकर्त्याला व्यापारी व्यवहारांसाठी भरावे लागणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आपल्या परिपत्रकात म्हटले की, UPI द्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यापारी व्यवहारांवर 1.1 टक्के प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क आकारले जाईल. ही बातमी आल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. प्रश्न असा आहे की, या निर्णयानंतर यूपीआय युजरसाठी महाग होईल का? हा शुल्क सर्व प्रकारच्या ऑनलाइन पेमेंटवर लादला जाणार आहे की कोणत्याही विशिष्ट विभागावर त्याचा परिणाम होणार आहे?

NPCI ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, व्यापारी UPI व्यवहारांवर हे शुल्क आकारले जाईल. म्हणजेच, बँका आणि प्रीपेड वॉलेटमधील पीअर टू पीअर (P2P) आणि पीअर टू मर्चंट (P2M) व्यवहारांवर हे शुल्क लागू होणार नाही. म्हणजे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय आणि काळजीशिवाय UPI वापरू शकता. तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर UPI पेमेंट पूर्णपणे मोफत आहे. तुमच्यासाठी काहीही बदललेले नाही. UPI बँक हस्तांतरणामध्ये काहीही बदल झालेला नाही.

नवीन नियम फक्त Wallets/PPI साठी आहे. म्हणजे तुम्ही वॉलेटमधून 2 हजारांपेक्षा जास्त व्यवहार केले तर तुम्हाला इंटरचेंज फी भरावी लागू शकते. म्हणजेच तुम्ही वॉलेट, क्रेडिट कार्ड यांसारख्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) द्वारे UPI पेमेंट केले तर तुम्हाला इंटरचेंज फी भरावी लागेल. हे शुल्क तुम्ही व्यापाऱ्याला केलेल्या एकूण पेमेंटच्या 1.1 टक्के असेल.

NPCI ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की बँक खाती आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPIs) दरम्यान पीअर-टू-पीअर आणि पीअर-टू-पीअर-व्यापारी व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परिपत्रकात, P2P, P2M व्यवहारांवर याची अंमलबजावणी करू नका, असे म्हटले आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा दुकानदाराला पैसे दिले आणि पेमेंट पर्याय म्हणून बँक खाते निवडले, तर तुम्हाला शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजेच, कोणत्याही प्रकारचे शुल्क टाळण्यासाठी UPI पेमेंट करताना बँक खात्याचा पर्याय निवडणे चांगले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.