नाथाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
आ.रोहित पवार यांची विशेष उपस्थिती
जळगाव – विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे गट नेते,आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसा निमित्त एकनाथराव खडसे यांची लाडु तुला व सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहिणीताई खडसे-खेवलकर यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. याप्रसंगी आ.रोहित पवार यांची विशेष उपस्थिती असेल. मुक्ताईनगर येथील खडसे फार्म हाऊस येथे सुध्दा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त, माजी आमदार, विविध फ्रंटल सेलचे अघ्यक्ष, पदाधिकारी यांनी दुपारी बारा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी आठ वाजता आ. रोहित पवार यांचे महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगांव रेल्वेस्थानकावर आगमन होणार आहे. यानंतर पवार हे राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील यांच्याकडे भेट देणार आहेत. 10.30 वाजता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या कॉलेज मध्ये रोहित पवार विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. यानंतर 11 वाजता पक्षाच्या आकाशवाणी येथील जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेवून ते मुक्ताईनगर येथील विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील. दुपारी चार वाजता बोदवड, पाच वाजता जामनेर येथील तालुका बैठकीला मार्गदर्शन करून संध्याकाळी सांडे सहा वाजता मेहरुण, आठ वाजता भक्त वत्सल श्रीराम मंदिर जैन मंदिराच्या मागे कॉर्नर मिटीग घेणार आहेत. याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी केली आहे.