DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

यावल येथे हाणामारीत एकाचा मृत्यू

यावल ;- शहरातील बोरावल गेट परिसरात दोन जणांमध्ये थट्टा मस्करी होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने जखमी झालेल्या एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, प्रभाकर आनंदा धनगर (वय ६०, रा.धनगर वाडा, यावल) असे मयत इसमाचे नाव आहे. तो त्याच्या परिवारासह यावल शहरात राहतो. शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ ते साडेसहा वाजेच्या सुमारास यावल शहरातील बोरावल गेट परिसरात भिकन धनगर यांच्या टपरीसमोर सार्वजनिक जागी प्रभाकर धनगर आणि संशयित आरोपी रामा केशव ढाके (वय ५५, रा.देशमुख वाडा, यावल) हे दोघे बसले होते. त्यावेळेला दोघांमध्ये सुरुवातीला थट्टा मस्करी सुरू झाली.

त्यानंतर मस्करीतून वाद निर्माण होऊन संशयित रामा ढाके याने त्याच्याकडील चाकूने प्रभाकर धनगर याला पोटात भोसकले. यामुळे प्रभाकर धनगर हा गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी रात्री दाखल केले. तेथे तासाभरानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला सुरुवातीला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. यात प्रभाकर धनगर यांचे भाऊ आनंदा धनगर यांच्या फिर्यादीवरून रामा केशव ढाके याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सकाळी प्रभाकर धनगर यांचा मृत्यू झाल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

तर आशा रामा ढाके (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून संशयित प्रभाकर आनंदा धनगर यांच्याविरुद्धदेखील खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर धनगर यांनी रामा ढाके याला अश्लील शिवीगाळ करून डोक्यात लोखंडी सळई मारून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुजफ्फर खान हे तपास करीत आहेत. मयत प्रभाकर धनगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगा असा परिवार आहे. प्रभाकर धनगर हे शेती काम करून उदरनिर्वाह करीत होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.